क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

Asian Games पाकिस्तानला अफगाणिस्ताननं लोळवलं; सुवर्णपदकासाठी उद्या भारताविरोधात लढत..

Asian Games 2023 Afg Vs Pak : भारतात सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा सीनियर संघ नेदरलँडविरुद्ध चाचपडत असतानाच तिकडं आशियाई गेम्समध्ये पाकिस्तानच्या ज्युनिअर संघाला त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या अफगाणिस्ताने अक्षरशः लोळवत गेमच्या फायनलमध्ये प्रवेश केला. अफगाणिस्तानने चार विकेटने पराभव करत अंतिम प्रवेश केला. त्यामुळे अफगाणिस्तानची लढत आता सुवर्णपदकासाठी भारताशी होईल.

नाणेफेक जिंकत अफगाणिस्तानने पहिल्यांदा पाकिस्तानला फलंदाजी दिली. मात्र, पाकिस्तानचा डाव अवघ्या 115 धावांमध्ये 18 षटकांमध्ये आटोपला. अफगाणिस्तान गुलबदीन एक विकेट घेतली, तर फरीद अहमदने तीन विकेट घेतल्या. कईस अहमदने दोन विकेट घेतल्या. करीम जनतने एक विकेट, तर झहीर खानने दोन विकेट घेतल्या.

अवघ्या 115 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या अफगाणिस्तानची सुरुवात सुद्धा खराब झाली होती. अवघ्या 14.1 षटकांत 6 बाद 84 अशी झाली होती. मात्र, सातव्या विकेटसाठी गुलबदीन नैब शराफुद्दीन अश्रफ यांनी केलेल्या 32 धावांच्या भागीदारीच्या जोरावर अफगाणिस्तानला विजय मिळवता आला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये