क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

न जिंकताच टीम इंडियाची ‘सुवर्ण’ कामगिरी, भारताने केली मेडल्सची सेंच्युरी पुर्ण

Asian Games 2023 Team India Gold : भारताने चीनममध्ये सुरु असलेल्या एशियन गेम्समध्ये अभूतपूर्व आणि ऐतिहासिक अशी कामगिरी करत नवा इतिहास घडवला आहे. भारताने मेंडल्सची सेंच्युरी (Iss Baar 100 Paar) पूर्ण केली. यात आता पुरुष क्रिकेट संघानेही गोल्ड मेडलची (Gold Medal) भर टाकलीय. एशियन गेम्समध्ये क्रिकेट प्रकारात पहिल्यांदाच खेळणाऱ्या टीम इंडियाने (Team India) सुवर्ण कामगिरी केलीय. मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने गोल्ड मेडलवर शिक्कामोर्तब केलं.

भारतीय क्रिकेट टीमनं बांग्लादेशचा पराभव करत फानलमध्ये धडक मारली. तर अफगाणिस्तानची टीम पाकिस्तानला धूळ चारत फायनलमध्ये दाखल झाली. अंतिम सामन्यात भारत आणि अफगाणिस्तान आमने सामने होते. भारताने टॉस जिंकला आणि पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना 18 षटकात 5 विकेट गमावत 112 धावा केल्या. पण त्यामुळे पावसाने हजेरी लावल्याने सामना थांबवण्यात आला. पाऊस थांबण्याचं नाव घेत नसल्याने अखेर टीम इंडियाला विजेता घोषित करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या टॉप रँकिंगमुळे टीम इंडिला गोल्ड मेडल देण्यात आलं. तर अफगाणिस्तानला सिल्व्हर मेडलनर समाधान मानावं लागलंय.

भारताने केली पदकांची सेंच्युरी
आशियन गेम्समध्ये भारताने पदकांची सेंच्युरी केलीय. भारतीय खेळाडूंनी 100 मेडल्सची कमाई केलीय.. महिला कबड्डीपटूंनी भारताला शंभरावं मेडल मिळवून दिलं.. तैपेईचा पराभव करत महिला कबड्डीपटूंनी सुवर्णपदक पटकावलं.. पुण्याच्या स्नेहल शिंदेची कामगिरी महिला कबड्डीपटूंच्या विजयात मोलाची ठरली.. एशियन गेम्समध्ये सुवर्ण कमाई करण्यात महाराष्ट्राचे खेळाडू आघाडीवर राहिले. नागपूरकर ओजस देवताळेने तिरंदाजीत गोल्ड मेडल्सची हॅटट्रिक केली.. तर मिक्स्ड डबल टेनिसमध्ये ऋतुजा भोसलेने रोहन बोपन्नाच्या साथीने गोल्डची कमाई केली.. स्टीपलचेसमध्ये अविनाश साबळेने सुवर्णपदक मिळवून दिलं. भारताच्या या कामगिरीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही खेळाडूंचं अभिनंदन केलंय..

आशियाई स्पर्धेतही भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. यावेळी आपण सौर के पार असा निर्धार केला होता, आणि भारतीय खेळाडूंनी हा निर्धार पूर्ण केला. 2018 साली आशियाई स्पर्धेत भारताने सर्वांधिक 71 पदक जिंकले होते. आशियाई स्पर्धा 2023 मध्ये भारताला एकूण 10३ पदकं मिळाली असून यामध्ये 27 सुवर्ण, 35 रौप्य, 40 कांस्य पदकांचा समावेश आहे. आशियाई स्पर्धेत भारतीय मेडल टॅलीत भारत सर्वाधिक मेडल्ससह चौथ्या स्थानावर आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये