आशियाई गेम्समध्ये भारताचा डंका; कबड्डीमध्ये पाकिस्तानला धूळ चारत फायनलमध्ये एन्ट्री
Asian Gamed 2023 | आशियाई गेम्समध्ये (Asian Games) भारताचे (India) खेळाडू दमदार कामगिरी करताना दिसत आहेत. अभिमानास्पद बाब म्हणजे भारताच्या खात्यात सुवर्णपदकांची भर होताना दिसत आहे. तर आता भारतानं कबड्डीमध्ये (Kabaddi) पाकिस्तानचा (Pakistan) दारूण पराभव केला आहे. पाकिस्तानला धूळ चारत भारतानं फायनलमध्ये एन्ट्री घेतली आहे.
कबड्डीमध्ये भारतानं 614 अशा फरकानं पाकिस्तानचा पराभव करत अतिंम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता भारतासाठी आणखी एक पदक निश्चित झालं आहे. तर आता भारत अंतिम फेरीत कशी कामगिरी करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
एकिकडे कबड्डीमध्ये भारतीय पुरूष संघानं अंतिम प्रवेश केला आहे तर दुसरीकडे महिला कबड्डीच्या उपांत्य फेरीत भारतानं दमदार कामगिरी करत नेपाळवर दणदणीत विजय मिळवला आहे. भारतीय महिलांनी 61-17 असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली आहे.