महाराष्ट्र गीतातील ‘ते’ कडवे वगळले… राज्य सरकार दिल्लीपुढे झुकले ?

पुणे | नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्राच्या अधिकृत राज्यगीतासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. कविवर्य राजा निळकंठ बढे यांच्या “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” (Jay Jay Maharashtra Maza) या गीतामधील दोन चरणांचे गीत महाराष्ट्राचे राज्यगीत (Maharashtra Song) म्हणून स्वीकारण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे सर्वत्र आनंद पसरला आहे. अशातच अॅड. असीम सरोदे (Adv. Asim Sarode) यांनी मात्र राज्य सरकारवर एक खळबळजनक दावा केला आहे. महाराष्ट्र गीतातील एक महत्वाचे कडवे शिंदे सरकारने वगळल्याचा आरोप अॅड. असीम सरोदे यांनी केला आहे.

महाराष्ट्र गीत (Maharashtra Song) घोषित करत असताना गीतातील तिसरं कडवं वगळण्यात आलं आहे. गर्जा महाराष्ट्र या गीतातील दिल्लीचे ही तख्त राखतो, महाराष्ट्र माझा… हे अत्यंत महत्त्वाचं कडवं वगळण्यात आलं आहे. हा महाराष्ट्र गीताचाच अपमान आहे. त्यावर राज्य सरकारने उत्तर दिलं पाहिजे, अशी मागणी अॅड. असीम सरोदे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

हे सगळे असताना, महाराष्ट्र गीतातील महत्त्वाचं कडवं वगळण्यात आल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. केंद्र सरकारपुढे राज्य सरकार झुकले आहे की काय? असा सवाल देखील राज्य सरकारला केला जात आहे. केंद्राला घाबरूनच राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. एवढे आरोप होऊनही शिंदे-फडणवीस सरकारकडून त्यावर अद्याप काहीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Dnyaneshwar: