ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

“आवाज तेलंगणापर्यंत पोहोचला पाहिजे”; मोदींचा विजयाच्या भाषणात पहिल्याच वाक्यावर सिक्सर

नवी दिल्ली : (Assembly Election 2023 PM Modi speech) देशातील चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकाचा निकाल आज जाहीर झाले. यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांत भाजपनं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. तर तेलंगणात भाजप तिसऱ्या स्थानी राहिला. या तीन राज्यातील दमदार विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात हजेरी लावली आणि जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी भाषणाला सुरुवात करताच पहिल्याच वाक्यात सिक्सर मारला.

मोदी म्हणाले की, भारत माता की जय हा आवाज तेलंगणापर्यंत पोहोचला पाहिजे. आजचा विजय ऐतिहासिक आणि अभुतपूर्व आहे. आज सबका साथ सबका विकासची भावना जिंकली आहे. आज विकसित भारताच्या आवाहनाचा विजय झाला आहे. आज आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा विजय झाला आहे. आज वंचितांच्या विचाराचा विजय झाला आहे.

आज भारताच्या विकासासाठी राज्याचा विकास या विचाराचा विजय झाला आहे. आज इमानदारी, पारदर्शकता आणि सुशासनाचा विजय झाला आहे. मी सर्व मतदारांना आदरपूर्वक नमन करतो. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या लोकांनी भाजपवर भरपूर प्रेम केलं. तेलंगणात देखील भाजपचा पाठिंबा सातत्यानं वाढत आहे.

हे आपल्या सर्वांचं सौभाग्य आहे की जेव्हा आपल्या कुटुंबियांकडून इतकं प्रेम मिळतं, विश्वास मिळतो. त्यामुळं मी व्यक्तीगतरित्या हे अनुभवतो की यामुळं माझी जबाबदारी अधिक वाढते. आजही माझ्या मनात हाच भाव आहे. मी माझ्या माता-भगिनी, युवा साथींसमोर, शेतकरी भावा-बहिणींसमोर नतमस्तक आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये