ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी
हिंदी पट्ट्यातून काँग्रेस ‘आऊट’, उत्तर भारतातील एकाही राज्यात सत्ता नाही, पराभवाला ‘या’ चुका कारणीभूत
मुंबई : (Assembly Election Result 2024) मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणुकांमध्ये (Assembly Election Result) काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याचं स्पष्ट झालंय. मध्य प्रदेशमध्ये आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला अपेक्षा असतानाही त्यांना जनतेने नाकारलं आहे. त्यामुळे 1980 नंतर पहिल्यांदाच उत्तर भारतातील हिंदी बेल्टमध्ये काँग्रेसची (Congress In Hindi Belt) सत्ता नसेल. त्यामुळे हिंदी बेल्टमधून काँग्रेस ‘आऊट’ झाल्याचं स्पष्ट झालंय.
- काँग्रेस प्रचाराबाबत संभ्रमात राहिली
काँग्रेस हायकमांड, विशेषत: मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या जोडीला हिंदी पट्ट्यातील राज्यांतील निवडणुकांपूर्वी गटबाजी आटोक्यात आणता आली नाही. निवडणुकीच्या काही दिवस आधी पक्षाच्या हायकमांडने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर न करण्याचा निर्णय घेतला. - तिकीट वाटपात विलंब झाल्याने चुकीचा संदेश
मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपने निवडणुकीच्या 3 महिने आधी तिकीट जाहीर केले. परंतु काँग्रेस हायकमांड तसे करण्यात अपयशी ठरले. काँग्रेसमध्ये उमेदवारी अर्जाच्या शेवटच्या दिवसांपर्यंत तिकीट वाटपावरून जोरदार खडाजंगी झाली होती. अनेक बड्या नेत्यांची तिकिटे कापल्याची चर्चा होती. तिकीट वाटपाच्या वृत्ताने काँग्रेसला चांगलाच फटका बसला. पण याचा फटका बसला हे हायकमांडला समजू शकले नाही. - निवडणूक राज्यांमध्ये काँग्रेसची देखरेख यंत्रणा कमकुवत
निवडणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी काँग्रेसने वरिष्ठ निरीक्षकांची नियुक्ती केली होती. परंतु ते संपूर्ण निवडणुकीच्या दृष्यातून गायब राहिले. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत आणि मध्य प्रदेशात कमलनाथ हे नेते होते. अशोक गेहलोत आणि कमलनाथ यांच्यापेक्षा दोन्ही राज्यांत हायकमांडने नियुक्त केलेले प्रभारी खूपच कमकुवत होते. सुखजिंदर रंधावा यांना राजस्थानमध्ये पक्षाचे प्रभारी बनवण्यात आले. रंधवा हे अशोक गेहलोत यांच्यापेक्षा खूप कनिष्ठ नेते आहेत. कमलनाथ यांच्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या सुरजेवाला यांच्याकडे पक्षाने मध्य प्रदेशच्या निरीक्षकपदाची कमानही दिली होती.