अथिया शेट्टीनं केली चोरी, सुनील शेट्टींनी ‘तो’ फोटो शेअर करत स्वत: केला खुलासा; म्हणाले…
मुंबई | Athiya Shetty : अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) ही नेहमी चर्चेत असते. ती सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. तर आता अथिया आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. कारण अथियावर सुनील शेट्टी (Sunil Shetty) यांनी चक्क चोरीचा आरोप केला आहे.
सुनील शेट्टींनी लेक अथिया शेट्टीवर चोरीचा आरोप केला आहे. तसंच त्यांची एक फोटो पोस्ट करत अथियाला चोर म्हटलं आहे. सुनील शेट्टींनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अथिया आरशासमोर पोझ देताना दिसत आहे. तर हा फोटो शेअर करत त्यांनी तिला चोर म्हटलं आहे.
फोटोमध्ये अथिया शेट्टीनं घातलेला जो बेल्ट दिसत आहे तो सुनील शेट्टींचा आहे. त्यामुळे त्यांनी अथियाला चोर म्हटलं आहे. तसंच हाच फोटो अथियानंही तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत अथियानं लिहिलं आहे की, पप्पांचा चोरलेला बेल्ट. तसंच तिनं हा फोटो शेअर करत सुनील शेट्टींना देखील टॅग केलं आहे. सध्या अथिया आणि सुनील शेट्टींची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होतीये.
दरम्यान, अथिय शेट्टीवर सुनील शेट्टी खूप प्रेम करतात. काही दिवसांपूर्वीच अथियाचा वाढदिवस झाला. तिच्या वाढदिवसानिमित्त सुनील शेट्टींनी खास पोस्ट करत लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.