कामाचे पैसे मागितल्याने कामगाराला जबर मारहाण; मंत्रालयासमोर कुटुंबासह आत्मदहनाचा प्रयत्न

मुंबई : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील माळवटा गावातील एका कुटुंबाने मंत्रालयाच्या समोर अंगावर रॉकेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. राजू चन्नापा हुनगुंडे असे आत्मदहन करणाऱ्या कुटुंबातील व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

दरम्यान, आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या हनगुंडे यांनी आरोप केले की, आपण नांदेड जिल्ह्यातल्या पालम रोड धानोरा काळे येथील जवळपास साडे आठ किलोमीटरच्या रस्त्याचं काम केलं. ज्याची किंमत १ कोटी ७० लाख रुपये आहे. त्यापैकी त्यांना फक्त १४ लाख रुपये देण्यात आले. कामाचे उर्वरित पैसे मागितले म्हणून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला जबर मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. याबाबत त्यांनी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांची देखील भेट घेतली होती. परंतु तरी देखील काम न झाले नाही. त्यामुळे अखेर कुटुंबासह आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे राजू यांनी सांगितले.

Dnyaneshwar: