ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

Shivsena Crisis: “ठाकरेंचे हात खेचले नसते, तर शिंदे आज जिवंत नसते”, संजय गायकवाड यांचा खळबळजनक दावा

मुंबई | Sanjay Gaikwad – शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी खळबळजनक दावा केला आहे. जर उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) हात खेचले नसते तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज जिवंत नसते, असं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं आहे. तसंच शिंदेंना जीवे मारण्याचा कट होता, असा गंभीर आरोपही गायकवाड यांनी केला आहे. संजय गायकवाड यांनी केलेल्या या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

संजय गायकवाड म्हणाले की, शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली होती. उद्धव साहेब देत होते, पण शिंदेंनी त्यांचे हातच घेतले, अशी टीका राऊतांनी केली. त्यालाच मी उत्तर दिलं आहे की, जर उद्धव ठाकरेंचे हात आम्ही खेचले नसते. तर एकनाथ शिंदे आज जिवंत दिसले नसते.

जेव्हा गडचिरोलीला एकनाथ शिंदे हे पालकमंत्री होते, त्यावेळी त्यांनी नक्षलवाद्यांविरोधात कडक भूमिका घेतली होती. त्यामुळे एकनाथ शिंदेंना नक्षलवाद्यांनी जिवे मारण्याची धमकी दिली होती. तर शिंदेंच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्याच प्रयत्न झाला. यासाठी राज्य सरकारनं शंभूराज देसाई तत्कालीन गृहराज्यमंत्र्यांच्या घरी बैठक बोलावली होती. मात्र, उद्धव ठाकरेंनी शंभूराज देसाईंना फोन करून एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरक्षा देऊ नका असं सांगितलं, असे आरोपही संजय गायकवाड यांनी केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये