ताज्या बातम्यापुणेसिटी अपडेट्स

धक्कादायक! आळंदीत धर्मांतराचा प्रयत्न, येशूचं रक्त म्हणून दिलं…

पुणे | Pune News – पुण्याच्या (Pune) आळंदीत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आळंदीत (Alandi) धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा प्रकार आळंदीच्या साठेनगर परिसरामध्ये घडला आहे. याबाबत उद्धव नागनाथ कांबळे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये सुधाकर बाबुराव सूर्यवंशी याच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या व्हिडीओमध्ये ख्रिश्चन धर्माविषयीची माहिती काही व्यक्तींना देण्यात येत आहे. तसंच व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या महिलेच्या हातात एक ताट असून त्यात लाल रंगाचं पाणी असलेले ग्लास दिसत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे लाल पाणी म्हणजेच द्राक्षाचं पाणी असून ते येशूचं रक्त म्हणून दिलं जात असल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदीत साठेनगर वस्तीत आरोपी सुधाकर बाबुराव सूर्यवंशी हा त्याच्या दोन साथीदारांसह काही स्थानिकांना “ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थनेनं तुमचे आजार बरे करतो, तुम्ही येशूची पूजा करा, तुमच्या आर्थिक आणि आरोग्याच्या समस्या दूर होतील, तुम्ही हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारा” असा आग्रह करत असल्याचं पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. तसंच ख्रिश्चन धर्मात येण्यासाठी आग्रह केला गेला म्हणून या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये