ताज्या बातम्यारणधुमाळी

“जित्याची खोड…”, आव्हाडांवरील कारवाईवर भाजप नेत्याचा खोचक टोला

मुंबई | Atul Bhatkhalkar On Jitendra Awhad Areest – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना पोलिसांनी अटक केली आहे. आव्हाडांना केलेल्या अटकेनंतर राजकीय वर्तुळातून अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. यामध्ये आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेच्या कारवाईचं स्वागत केलं आहे. अत्यंत योग्य आणि स्वागतार्ह कारवाई असल्याचं भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी म्हटलं आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या विवियाना माॅलमध्ये सुरू असलेला ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण देखील करण्यात आली होती. त्या प्रकरणी ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी आव्हाडांना अटक केली. यावर अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“अत्यंत योग्य आणि स्वागतार्ह कारवाई आहे. सार्वजनिक ठिकाणी जाऊन गोंधळ घालणं, लोकांना मारहाण करणं योग्य नाही. चित्रपटावर आक्षेप होता तर सेन्साॅर बोर्ड किंवा पोलिसांकडे तक्रार करता आली असती. पण स्वत: लोकप्रतिनिधी असताना कायदा हातात घेणं ही आव्हाडांची जुनी खोड आहे”, असं भातखळकर म्हणाले.

पुढे अतुल भातखळकरांनी एक ट्विट केलं आहे. “जित्याची खोड…पोलिसांचे दंडूके पडल्याशिवाय जात नाही”, असा खोचक टोलाही भातखळकरांनी आव्हाडांना लगावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये