क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

ऑस्ट्रेलियाशी राशीद खान एकाकी झुंजला; अवघ्या चार धावांनी सामना हातून निसटला!

(Australia VS Afghanistan T-20 World Cup Match) टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील आपल्या अखेरच्या आणि महत्वपूर्ण सामन्यात ऑस्ट्रेलियाने संघानं चार धावांनी अफगाणिस्तानचा हातातून सामना हिरावला. या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघानं अफगाणिस्तानसमोर 169 धावांचं लक्ष्य ठेवलं.

प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघानं 164 धावा केल्या. अखेरच्या षटकात अफगाणिस्तानच्या संघाला 22 धावांची गरज असताना, ऑस्ट्रेलियाशी राशीद खान एकाकी झुंजला. मात्र, अवघ्या चार धावांनी सामना हातून निसटला! त्यामुळे संघाला विजय मिळवून देण्यास तो अपयशी ठरला. 

या षटकातील पहिला चेंडू राशीदनं निर्धाव खेळला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकून अफगाणिस्तानच्या अपेक्षा जिवंत ठेवल्या. मात्र, तिसरा चेंडू निर्धाव टाकत स्टॉयनिसनं कमबॅक केलं. चौथ्या चेंडूवर षटकार मारत राशीदनंही आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर पाचव्या चेंडूवर राशीदनं उत्तुंग फटका मारला. मात्र, हा चेंडू मैदानातच पडला. या चेंडूवर राशीदनं दोन धावा काढल्या. यानंतर सामना पूर्णपणे ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं झुकला फक्त औपचारिकता म्हणून अखेरचा चेंडू टाकण्यात आला. या चेंडूवर राशीदनं चौकार मारला. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये