टाॅप आर्डर धारातिर्थी! क्लासेन-मिलरने खिंड लढवली; आफ्रिकेचा डाव सावरला?
कोलकत्ता : (Australia vs South Africa, CW 2023 Semi Final) दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये विश्वचषक 2023 चा सेमीफायनल सामना कोलकत्त्याच्या ईडन गार्डन मैदानावर खेळवला जात आहे. आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्याच षटकात दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला. मिचेल स्टार्कने कर्णधार टेम्बा बावुमाला यष्टिरक्षक जोश इंग्लिसकडे झेलबाद केले. बावुमा यांना खातेही उघडता आले नाही.
कर्णधार टेम्बा बावुमा पाठोपाठ क्विंटन डी कॉक बाद झाला आहे. जोश हेझलवूडने त्याला पॅट कमिन्सकडून झेलबाद केले. त्याने १४ चेंडूत केवळ ३ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेची तिसरी विकेट २२ धावांवर पडली. एडन मार्कराम २० चेंडूत १० धावा करून बाद झाला. मिचेल स्टार्कने त्याला डेव्हिड वॉर्नरकरवी झेलबाद केले.
रॅसी व्हॅन डर डुसेन ३१ चेंडूत सहा धावा करून बाद झाला. जोश हेझलवूडने त्याला स्टीव्ह स्मिथकरवी झेलबाद केले. आता हेन्रिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर क्रीजवर आहेत. या दोघांना मोठी भागीदारी करत संघाला पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. 30 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 109 आहे.