“एकदा नाही लाख वेळा गद्दार म्हणणार”, सेनेची रणरागिणी कडाडली! हिंमत असलं तर…

मुंबई : (Ayoddhya Poul On Santosh Bangar) ठाकरेंसाठी अश्रू ढाळणारे आणि शिंदे गटात जाण्यासाठी २४ तासांत पलटी मारलेले हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी काल कार्यकर्त्यांना चिथावणी देताना हिंसेची भाषा बोलली. ते म्हणाले, मला शिवसैनिकांना एकच सांगायचं आहे. आपण बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत. जे कुणी आपल्याला गद्दार म्हणत असेल, त्याच्या कानाखाली आवाज काढा. आम्हाला कुणी का रे म्हणलं, तर त्याच्या कानाखाली जाळ काढल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीत असं वादग्रस्त वक्तव्य बंगार यांनी केलं होतं.
दरम्यान, यांचं हे वक्तव्य शिवसेनेच्या एका कट्टर सोशल मीडिया संघटक महिला पदाधिकारी असलेल्या अयोध्या पौळ यांच्या चांगलेचं जिव्हारी लागलं आहे. त्या आपला राग व्यक्त करताना म्हणाल्या, शिवसैनिक तोच आहे जो ठाकरे कुटुंबाशी आणि मातोश्रीशी प्रमाणिक आहे. ज्या-जा लोकांनी मातोश्रीला धोका दिला ते माझ्यासाठी गद्दारच आहेत. त्यामुळं मी एकदा नाही तर लाख वेळा गद्दार म्हणणार. संतोष बांगर यांच्यात हिम्मत असेल तर माझ्या कानाखाली त्यांनी मारावी.
त्यांच्या या आव्हानाला सेनेच्या पदाधिकारी अयोध्या पौळ यांना आता प्रति आव्हान दिलं आहे. संतोष बांगर यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी मला मारावं. त्यांच्या बगलबच्च्यांना मला फोन करुन धमकी द्यायला लावू नये. त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी स्वत: मला फोन करावा, अशा शब्दात अयोध्या पौळ यांनी ठणकावलं आहे. मी त्यांच्या धमक्यांना मी घाबरणारी नाही. मी बाळासाहेब ठाकरेंची निष्ठावान शिवसैनिक आहे, असं अयोध्या पौळ म्हणाल्या.