अयोध्येतील राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा! चक्क कंगनालाच निमंत्रण नाही, ‘या’ सेलेब्रेटींना मात्र बोलावणं
Ayodhya Ram Mandir Inauguration News : अयोध्या राम मंदिराची प्राणप्रतिष्ठास्थापना लवकरच होणार आहे. संपूर्ण भारतवासी या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अयोध्येत नव्याने बांधलेल्या रामलल्लाची मूर्तीचे 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातील नामवंत व्यक्तींना आमंत्रित केले आहे.
या यादीत 3 हजार व्हीव्हीआयपींसह एकूण 7 हजार लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. ट्रस्टने ३,००० व्हीव्हीआयपींसह ७,००० लोकांना आमंत्रणे पाठवली आहेत. या आमंत्रितांमध्ये दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या रामायण या मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल आणि देवी सीतेची भूमिका साकारणारी दीपिका चिखलिया यांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मनोरंजन विश्वातून निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत.
याशिवाय इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, आशा भोसले यांनाही निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. परंतु या यादीत कंगना रणौतला आमंत्रण नाही. 22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या अभिषेक सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.