आझम ने पुण्याचे नाव आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात रोवले
![आझम ने पुण्याचे नाव आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात रोवले Blue Guest Featured Live Event Twitter Post 48](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2024/03/Blue-Guest-Featured-Live-Event-Twitter-Post-48-780x470.jpg)
पुणे | अतिशय गरीब घरातील ८० विद्यार्थ्यांना बाहेरून आझम कॅम्पसमध्ये आणले आहे. ज्यांना शिकण्याची, खेळात काहीतरी विशेष कामगिरी करून दाखवण्याची उमेद आहे अशा विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. या विद्यार्थ्यांमध्ये ५ मुस्लिम आहेत आणि राहिलेले मुस्लिम नाहीत. आमच्या कॅम्पसमध्ये जात, पात, धर्म याचा विचार आम्ही करत नाही. संपूर्ण भारतात ऑल इंडिया लेव्हलवर १०० हून अधिक आझमच्या विद्यार्थ्यांनी मेडल घेतले आहे. त्याला डबल सिक्सर म्हणजे आऊट ऑफ इंडियामध्ये इंटरनॅशनल लेव्हलवर अनेक गोल्ड मेडल घेतली आहेत, हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. या सर्व विद्यार्थ्यांना कोचिंग देणारे आमचे कोचेस उत्तम प्रशिक्षित आहेत. रात्रंदिवस ज्यांची कष्टाची तयारी आहे त्यांच्यासाठी आझम स्पोर्टस् अॅकॅडमी कायम मदतीसाठी पुढे असेल. असे मत डॉ.पीए.इनामदार विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी.ए.इनामदार यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आझम स्पोर्टस अकॅडमीच्या वतीने डॉ.पी.ए.इनामदार आणि आबेदा इनामदार स्पोर्टस् एक्सलेंस अवॉर्ड २०२३-२४ चे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम शनिवार दिनांक २३ मार्च रोजी डॉ.ए.आर.शेख असेम्ब्ली हॉल येथे मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी दैनिक राष्ट्र संचार च्या वतीने आझम स्पोर्टस् अकॅडमीमधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंची गौरवगाथा प्रकाशित करणाऱ्या सेंट्रल स्प्रेड चे प्रकाशन करण्यात आले. विद्यापीठातील ही कामगिरी आजवर सर्वच माध्यमांकडून दुर्लक्षित राहिली होती. डॉ. पी.ए.इनामदार यांनी या योगदानाचा विशेष उल्लेख करून कौतुक केले.१ याप्रसंगी डॉ.पी.ए.इनामदार एक्सल्न्स ॲवार्ड पुरूष गटात अलोक तोडकर (व्हॉलीबॉल), अखिलेश भोसले (आर्चरी कंपाऊंड), विनय कोंडामुरी (फुटबॉल), अनुज गावडे (कबड्डी लिफ्ट सेंटर), संदीप गोंडे (अॅथलेटिक्स ११० मी.), तालीम साहा (हॉकी), गजानन खंडागळे (एअर रायफल १० मी.), रेनॉल्ड जोसेफ (बॉक्सिंग), अभिजीत दिसले (वेट लिफ्टिंग), विक्रम इंगळे (स्केटिंग) यांना सन्मानित करण्यात आले. तर आबेदा इनामदार आबेदा इनामदार स्पोर्टस् एक्सलेंस अवॉर्ड महिला गटात ग्रीष्मा कर्णे (व्हॉलीबॉल), ऐश्वर्या भोंडे (फुटबॉल), मनीषा राठोड (कबड्डी) अवंतिका नराळे, (ॲथलेटिक्स १००/२०० मी), अंबर सय्यद (हॉकी) अंतरा दाऊन (एअर पिस्तूल), श्रुतिका सरोदे (रोलर स्केटिंग), साई डावखर (बॉक्सिंग), पुनम खेमनार (क्रिकेट), अनया पाटील (वेट लिफ्टिंग) यांना सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
यावेळी एमसीई सोसायटीचे सचिव डाॅ.इरफान शेख, आझम स्पोर्टस् अकॅडमीचे संचालक डॉ.गुलजार शेख, दैनिक राष्ट्र संचार चे मुख संपादक अनिरुध्द बडवे, उपसंपादक सारिका रोजेकर आदी उपस्थित होते. आझम कॅम्पस स्पोर्टस् अॅकॅडमीच्या माध्यमातून जे विद्यार्थी येथे खेळतात त्यांना लागणाऱ्या सोयी सुविधा आम्ही पुरवतो. जे बाहेर गावाहून येतात त्यांच्या निवासाची, खाण्याची व्यवस्था अॅकॅडमीच्या माध्यमातून विनामूल्य केली जाते. महिला खेळाडूंची विशेष काजळी घेतली जाते. अॅकॅडमीमध्ये नॅशनल आणि इंटरनॅशनल लेव्हलवर खेळाडू खेळत आहेत, त्यांना प्रोत्साहन दिल्याने ते मैदान गाजवत आहेत. अनेक खेळाडू आहेत ज्यांना संधी दिली जात नसल्याने ते त्यांचे टॅलेंट दाखवू शकत नाही. आझम कॅम्पस अशा मुलांमधील टॅलेंट ओळखून त्यांना संधी देते, त्यांना लागणाऱ्या सोयी सुविधा देते. त्यामुळेच ते संधीचे सोने करतात. सच्च्या खेळाडूंना प्रोत्साहित केले पाहिजे. अशा प्रोत्साहनाच्या आधारावर स्पर्धकांचे मनोधैर्य वाढते, असे उद्गार आबेदा इनामदार यांनी व्यक्त केले.
डॉ.पी. ए. इनामदार यांच्या संकल्पनेतून आझम स्पोर्टस् अॅकॅडमीला २००७ मध्ये सेंट्रलाइजचे स्वरूप देण्यात आले. स्पोर्टस् अॅकॅडमी सेंट्रलाइज झाल्यानंतर के जी टू पी जीच्या सर्व विद्यार्थ्यांना पर्चेसिंग, कोचिंगचे फायदे मिळत आहेत. आत्तापर्यंत २८ मुलांनी इंटरनॅशनल लेव्हलला सहभाग घेतला आहे. ७९७ नॅशनल प्लेयर्स आहेत. हे आकडे दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत, ही गोष्ट अभिमानास्पद आहे. कष्टाची तयारी असलेल्यांनी येथे यावे त्यांना डॉ.पी. ए. इनामदार यांचे पाठबळ मिळणारच. नॅशनल, इंटरनॅशनल लेव्हलच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व एक्सपर्ट कोचेस आम्ही बाहेरून बोलावतो. कष्ट आणि जिद्द अंगी असणाऱ्या खेळाडूला लागणारे सर्व आर्थिक पाठबळ आम्ही पुरवतो, असे आझम स्पोर्टस् अकॅडमीचे संचालक डॉ.गुलजार शेख म्हणाले.