“लम्पी व्हायरस पाकिस्तानातून आलाय, गाईंना…”; बाबा रामदेवांचा मोठा दावा

नवी दिल्ली Baba Ramdev On Lumpy Virus : सध्या देशभरात लम्पी व्हायरसने धुमाकूळ घातलाय, हजारोंच्या संख्येनं जनावरे देशाच्या वेगवेगळ्या भागात दररोज या रोगाच्या प्रभावामुळे मरत आहेत. सरकारकडून यावर तात्पुरते पर्याय शोधले जात आहेत. मात्र, या रोगावर कोणतेही औषध अस्तित्वात नाहीये. दरम्यान, योगगुरू बाबा रामदेव यांनी लम्पी व्हायरस पाकिस्तानातून आला असल्याचा दावा केला आहे. हरिद्वारमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते.
बाब रामदेव म्हणाले की, “सनातनच्या मूल्यांना इजा पोहोचवण्यासाठी आणि गाईंना आजारी पाडण्यासाठी लम्पी व्हायरसचा प्रसार करण्यात आला आहे. लम्पी पाकिस्तानातून भारतात आला आहे. सरकारने याची चौकशी करायला हवी.” अशी मागणीही बाबा रामदेव यांनी केली आहे. त्याचबरोबर “गाई निरोगी ठेवण्यासाठी त्यांना गिलॉय द्यायला पाहिजे.” गिलॉयने प्राणी बरे होत असल्याचंही बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे.