हे वागणं बरं नव्हं! दोन माजी मंत्र्यांनी वाहिली शिव्यांची लाखोळी, संभाषण व्हायरल..
मुंबई : (Bababnrao Lonikar On Rajesh Tope) जालना जिल्ह्यातील दोन ज्येष्ठ नेते माजी मंत्री राजेश टोपे आणि दुसरे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये लोणीकर हे टोपेंना शिव्या घालताना दिसून येत आहेत, शिवाय धमकीही देत आहेत. यानंतर लोणीकरांनी ती क्लिप बनावट असल्याचं म्हटलंय.
जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील उपाध्यक्ष निवडीवरुन दोन नेत्यांमध्ये वाद झाल्याचं दिसून येतंय. महिन्याभरापूर्वीदेखील लोणीकरांच्या कार्यकर्त्यांनी टोपेंच्या गाडीवर दगडफेक केली होती. त्यानंतर टोपेंच्या कार्यकर्त्यांनी लोणीकरांच्या घरावर दगडफेक केली होती.
त्यानंतर ही क्लिप व्हायरल झालीय. सदरील व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये, बँकेच्या उपाध्यक्ष पदासाठी लोणीकरांच्या मुलाची निवड करणं ठरलेलं असतानाही दुसऱ्याची निवड झाली, अशा आशयाचा संवाद आहे. त्याचा राग लोणीकरांनी काढल्याचं दिसून येतंय. ‘सकाळ’ या ऑडिओ क्लिपची पुष्टी करीत नाही.
कथित ऑडिओ क्लिपमधील संवाद
टोपे- अर्जूनराव साक्षीदार आहेत. अर्जूनराव बोलले, दानवेंना मीही बोललो.. काल तर टोकाचं बोलणं झालं. परंतु ते म्हणाले, भैय्यासाहेब यावेळेस आम्हाला पाहिजे.. काल फोनवर आज लग्नातही बोलले. मी म्हणोलो आपण पहिल्यांदा बोललो बबनरावांना… आपल्याला राहुलला उपाध्यक्ष करायचंय. ते म्हणाले, ते आले नाहीत.. चर्चेत नव्हते. यावेळेस तुम्ही सोडावं असं मी त्यांना बोललो…
लोणीकर- भैय्यासाहेब, राजकारण मोठं नसतं. त्या उपाध्यक्ष पदामध्ये काहीही नाहीये.. आम्हाला माहिती आहे. तुम्ही शब्द दिला अर्जुनरावांच्या बंगल्यावर चर्चा केली-
टोपे- शब्द पाळू ना पण पुढच्या याच्यात पाळू…
लोणीकर- अरे हा @@#%^& कडू तुझं टक्कल.. तु*&&^@# टोप्या.. कडू%@@# चोर कुत्रा..