घरात घुसून मारण्याची भाषा करणाऱ्या रवी राणांना बच्चू कडूंचं आव्हान; म्हणाले…
मुंबई | Ravi Rana And Bacchu Kadu – प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) हे पुन्हा एकदा आमने-सामने येणार असल्याची शक्यता काही. काही दिवसांपूर्वीच या दोघांमधील वाद मिटल्याची चित्र होती मात्र आता पुन्हा एकदा त्यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता आहे. तसंच यापूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी केली होती. तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू माझ्या सांगण्यावरून गुवाहाटीला गेल्याचं विधान करून कडूंना एक प्रकारे क्लीनचीट दिली होती. यादरम्यान, आज (3 नोव्हेंबर) बच्चू कडू मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.
काही दिवसांपूर्वी रवी राणांनी दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र बच्चू कडूंनी माफी देताना पुढच्या वेळी सोडणार नाही असा इशारा दिला होता. कडूंनी दिलेल्या या धमकीवजा इशाऱ्यानंतर पुन्हा दोघांमध्ये नवं वाग्युद्ध सुरू झालं आहे. रवी राणा यांनी धमकी देणाऱ्यांना घरात घुसून मारणार, असं वक्तव्य केलं आहे. यावर रवी राणांनी मारायला यावं, असं आव्हान बच्चू कडूंनी दिलं आहे.
दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकार समर्थक दोन अपक्ष आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले होते. रवी राणी (Ravi Rana) आणि बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यातील वादावर तोडगा काढण्यासाठी शिंदे-फडणवीसांना मध्यस्थी करावी लागली. मुंबईत झालेल्या बैठकीनंतर रवी राणा यांनी दिलगीरी व्यक्त केली. त्यानंतर बच्चू कडू यांनी सोमवारी रात्री कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या आणि आपली भूमिका जाहीर करण्यासाठी 1 नोव्हेंबर रोजी अमरावती येथे मेळाव्याचं आयोजन केलं होतं. त्यावेळी दोघांकडून हा वाद संपल्याचं कडू आणि राणा यांनी व्यक्त केलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा या दोघांमध्ये नवीन वाद सुरू झाला आहे.