“मुख्यमंत्री शिंदेंसह, आम्हा सर्वांना तुरुंगात टाकावं”; बच्चू कडू असं का म्हणाले?
मुंबई : (Bacchu Kadu On Eknath Shinde) प्रहार संघटनेचे प्रमुख आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांना पत्रकारांनी महाविकास आघाडीसोबत का युतीसोबत निवडणूक लढवणार? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना कडू म्हणाले, अजून लग्न ठरायचं आहे, तारिख ठरायची आहे. त्याआधीच मंगलकार्यालयाचं नाव कसं सांगू, अशी मिश्किल टिप्पणी यावेळी त्यांनी मिश्किल केली आहे.
अजून तारिख ठरायची आहे. त्यामुळे तारिख ठरल्यानंतर याबाबत निर्णय घेऊ. अजून वातावरण तयार झालेलं नाही. त्यामुळे आत्ताच निर्णय घेणार नाही. प्रहारची १५ जागांवर लढण्याची तयारी आहे. पण, आमचा सगळ्या दृष्टीकोणातून विचार झाला तर भाजपचा आम्ही विचार करु. प्रत्येकाने आपापलं घरं जपायचं असते. घर न जपता काम सुरु केलं तर पक्ष सोडून नुसती समाजसेवाच सुरु करावी लागेल. आम्ही राजकीय पक्ष आहोत आणि राजकीय पद्धतीने आम्ही याला सामोरे जावू, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
आरोप करताना पुरावे न घेता बोललं जातंय. त्यानंतर त्याची बातमी केली जाते. खोक्यांच्या बाबतीत आरोप करण्यात आले आहेत. आम्हा सर्वांना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासकट तुरुंगात टाकावं. आम्ही समोर येतो. तुमच्याकडे पुरावे आहेत का? पुरावे नसताना खोके घेतले, खोके घेतले म्हणून आरोप कशाला करायचे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.