शेतकऱ्यांचे नेते बच्चू कडूच म्हणतात, “ओला दुष्काळ जाहीर करण्याची…”
मुंबई : (Bacchu Kadu On Formers) परतीच्या पावसाने हा हा माजवल्याने शेतकरऱ्यांची दाणादाण उडाली असून, शेतीपिकांची नासाडी झाल्याने सामान्यांच जीवन उद्ध्वस्त होण्याची वेळी आली आहे. यंदा राज्यभरात अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, संपूर्ण खरीप पीक हातातून गेले आहे. मागील आठवड्यापर्यंत सुरू असलेल्या पावसाने रब्बीचा हंगाम धोक्यात आला आल्याने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांनी केली.
मात्र, शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवले जाणारे राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांनी मात्र ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज नाही, असं वक्तव्य केलंय. जिथे खूपच पाऊस झालाय तिथे सरकारची मदत पोहोचली आहे, सरकार मदत करत आहे, त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे असं वाटत नसल्याचं बच्चू कडू म्हणाले. मागील काही वर्ष शेतकऱ्यांना मिळणाऱ्या हमीभावावर, कर्जमाफीवर, पीक विम्यावर आवाज उठवणारे हे तेच बच्चू कडू आहेत का? असा प्रश्न आता राज्यातील शेतकरी विचारतायेत.
अतिवृष्टीमुळे आणि परतीच्या पावसामुळे लाखो शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली. हातातोंडाशी आलेलं पीक मातीमोल झालं. अशा सगळ्या परिस्थितीत ओला दुष्काळ जाहीर करुन मायबाप सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, अशी मागणी झाली. मात्र सरकारी पातळीवरुन ‘मदत करतो आहे, ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज नाही’, अशी वक्तव्ये शिंदे सरकारमधील मंत्री करतायेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केल्यानंतर आताच्या शिंदे सरकारला पाठिंबा दिलेले आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही सत्तारांचीच री ओढल्याचे दिसून येत आहे.