ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

मराठा समाज पाकिस्तानी की अमेरिकन? सरकारवर बच्चू कडू संतापले

जालना : (Bacchu Kadu On State Government) मराठा समाज हा पाकिस्तानी आहे की अमेरिकन? असा सवाल प्रहार संघटनेचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ प्रहार संघटनेकडून सिंदखेड राजा शहरात रक्तदान महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर हल्लाबोल चढवला.

बच्चू कडू यांनी काल आंतरवली सराटी इथं मराठा आंदोलनाचे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची भेट घेतली. तसेच त्यांनी उपोषण मागे घ्यावं अशी विनंती केली. पण जरांगे आपल्या उपोषणावर ठाम आहेत. यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला.

यावेळी कडू म्हणाले, “निवडक मराठ्यांना आपण वाळीत टाकल्यासारखं करतो. तसंही ओबीसीला भेटलेलं आरक्षण कमीच आहे. आमचा वाटा जास्त आहे देशात ओबीसींच आरक्षण ५२ ते ५५ टक्क्यांवर जातं पण आपल्याला २७ टक्के आरक्षण मिळालं आहे.

त्यामुळं ओबीसींना आरक्षण वाढवून द्यावं. त्यासाठी मदत करा किंवा त्यात अबकड अशी वर्गवारी करा. पण नाही म्हणणं हे चुकीचं आहे. मराठा कोण आहे? पाकिस्तानचा आहे की अमेरिकेचा आहे? मग यांचा आरक्षणावर अधिकार का नाही? असा सवालही त्यांनी यावेळी सरकारला विचारला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये