देश - विदेश

“…तर सगळे पक्ष भाजपात विलीन करा”, बच्चू कडूंचा भाजपवर हल्लाबोल

अमरावती : (Bachhu Kadu On Devendra Fadnavis) प्रहार संघटनेचे अध्यक्ष अन् आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा भाजपला लक्ष्य केलं आहे. कुणाच्या नेतृत्वात निवडणूक लढायची, कोण मुख्यमंत्री होणार हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवणार आहेत. तर, मग सगळे पक्ष विलीन करून भाजपत जाणं हा चांगला मार्ग आहे, असा हल्लाबोल बच्चू कडू यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार आणि संधी मिळाल्यास अजित पवारांना ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री करू, अशी दोन विधान देवेंद्र फडणवीस यांनी केली आहेत. याबद्दल प्रश्न विचारल्यावर बच्चू कडू म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांच्या मनात काय आहे, हे सांगता येत नाही. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढत अजित पवारांना मुख्यमंत्री करणार असतील, तर लोकांमध्ये मोठा संभ्रम आहे. ज्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढतो, त्यांना मुख्यमंत्री करतात. इथे उलटे होत आहे.”

“अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षांचं सर्व देवेंद्र फडणवीस हे ठरवणार, हाही मोठा संभ्रम आहे. कुणाच्या नेतृत्वात निवडणूक लढायची, कोण मुख्यमंत्री होणार हेही देवेंद्र फडणवीस ठरवणार. त्यापेक्षा सगळे पक्ष विलीनकरून भाजपमध्ये जाणं, हाच चांगला मार्ग आहे,” असा टोला बच्चू कडूंनी लगावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये