ताज्या बातम्या

Bageshwar Baba Controversy : भाजप नेते नितीन गडकरी सुद्धा बागेश्वर बाबांपुढे नतमस्तक होतात

नवी दिल्ली | लाल रंगाची पगडी घातलेले एक बाबा सध्या न्यूज चॅनेलवर चांगलेच गाजत आहेत. या 26 वर्षीय बागेश्वर बाबांचा (Bageshwar Baba) आवाज सर्वत्र घुमताना दिसतोय. तुझी बायको विचित्र आहे, बायकोमुळे भांडण होत आहे, ती घमंडी आहे आणि अजून बरंच काही…. बागेश्वर बाबांच्या अशा वक्तव्यांचे अनेक व्हिडीओ गेल्या अनेक तासांपासून सोशल मिडियावर वायरल होत आहेत. मग कोण आहेत हे बागेश्वर बाबा (Bageshwar Baba)? बागेश्वर धाम सरकार म्हणजे काय (Bageshwar Dham Sarkar)? काय आहे धीरेंद्र शास्त्रींचे (Dhirednra Shastri) सत्य ? आता त्यांच्या दाव्यांवर असे प्रश्न उपस्थित का केले जात आहेत, त्यांना आव्हाने का दिली जात आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) देखील बागेश्वर बाबांपुढे डोके टेकवतानाचा फोटो सध्या सोशल मिडियावर वायरल होतोय.

बागेश्वर बाबा आत्ता चर्चेत येण्याच कारण म्हणजे चमत्काराच्या नावाखाली अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ही तक्रार केली आहे. या आरोपांबाबत प्रसार माध्यमांनी जेव्हा धीरेंद्र शास्त्री यांना प्रश्न विचारले तेव्हा ते म्हणतात, भारत हा असा देश आहे जिथे प्रभू रामाच्या अस्तित्वाचा पुरावाही मागितला गेला. पण सत्याला प्रमाणपत्राची गरज नाही. जे आहे ते सत्य आहे. ते आमचे हनुमानजी आहेत, बागेश्वर बालाजी आहेत. या प्रकरणी त्यांच्यावर अनेक टीका झाल्या. टीका करणाऱ्यांविरोधात प्रवचनात बोलताना बागेश्वर बाबा म्हणाले, ‘हनुमान जी आम्हाला जी प्रेरणा देणार, आम्ही तेच सांगणार. जे अधर्मी लोक आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की, जे तुम्ही करत आहात तेच आम्ही करतोय. आम्हीही अंधश्रद्धेच्या विरोधात आहोत. आम्हीही जादू, टोना, तंत्र, मंत्राच्या विरोधात आहोत.

या दोन दिवसात गुगलवर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे वय, बागेश्वर धाम सरकार काय असते अशा गोष्टी सर्च केल्या जात आहेत. नुकताच नागपुरमध्ये बागेश्वर बाबांचा कायक्रम पार पडला. बागेश्वर बाबांबद्दल असे म्हणतात की बाबांच्या ‘दिव्य दरबारात’ शेकडो लोक समस्या घेऊन जातात, ते लोकांना नावाने हाक मारतात आणि ते लोक जवळ येईपर्यंत बाबा त्यांची समस्या एका कागदावर लिहून ठेवतात. हे पाहून लोकांचा बाबांवर विश्वास अधिक वाढू लागलाय. त्यांची रामकथा ऐकण्यासाठी दूरदूरवरून लोक येतात. बाबांच्या दरबारात येणाऱ्या लोकांकडून कोणतीही फी घेतली जात नाही.

अनेक राजकीय नेते सुद्धा बागेश्वर बाबांपुढे झुकलेले पाहायला मिळालेत. नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बागेश्वर धाम सरकारची भेट घेण्यासाठी नागपुरात पोहोचले. नितीन गडकरी मंचावर जाऊन बागेश्वर बाबांना हात जोडून नमस्कार केला. काही हसतमुख गप्पा झाल्या आणि गडकरींनी फुलांचा हार घालून त्यांचे स्वागत केले. एक मिनिटभर गडकरी आणि बागेश्वर बाबा यांच्यात चर्चा सुरु होती. तो संपूर्ण वेळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बागेश्वर बाबांपुढे हात जोडून उभे होते. त्यानंतर व्यासपीठावरून बोलताना गडकरी म्हणाले की, मी परमपूज्य गुरुजींना वंदन करतो. आपल्या सर्वांना समाजात चांगले कार्य करण्याचे बळ मिळो, अशीच प्रेरणा मिळो आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या हातून समाजातील गरिबांची सेवा घडो आणि ते आपल्या पाठीशी राहो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना.

कोण आहेत पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री

पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा जन्म 1996 मध्ये छतरपूर जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबात झाला. लहानपणी घरची परिस्थिती अशी होती की एकाच वेळचे जेवण त्यांना मिळायचे. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी लोकांचे दु:ख दूर करण्यासाठी एक दैवी दरबार आयोजित करण्यास सुरुवात केली.

बागेश्वर धाम सरकार म्हणजे काय ?

छतरपूरजवळ गढा नावाचे एक ठिकाण आहे, तिथे बागेश्वर धाम आहे. त्याठिकाणी बालाजी हनुमानाचे मंदिर आहे. तिथे मंगळवारी मोठी गर्दी होते. हळूहळू लोक या दरबाराला बागेश्वर धाम सरकार या नावाने संबोधू लागले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये