लोणावळ्यातील अपघातांचे सत्र थांबणार? शहरात सकाळी अवजड वाहतूकीला बंदी
लोणावळा शहरात सातत्याने निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीची आणि अपघातांची समस्या दूर करण्यासाठी लोणावळा शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा एक्झिट ते वलवण एक्झिट दरम्यान सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत जड आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीला कायमस्वरुपी बंदी घातल्याची अधिसूचना जिल्हाधिकारी पुणे यांनी पारित केली आहे. त्यामुळे यापुढे सर्व प्रकारचे टेम्पो, ट्रक, ट्रेलर, टँकर यांना या मार्गाने शहरातून प्रवास करता
येणार नाही.
हेही वाचा- सिंहगडावरील वाहतूक कोंडीबाबत वनविभागाचा मोठा निर्णय; काय आहे? घ्या जाणून
लोणावळा शहरातून जुना पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग ४ जात असून, लोणावळा शहरामध्ये शनिवार, रविवार तसेच इतर सार्वजनिक सलग सुट्ट्या असतात, तेव्हा पर्यटक मोठ्या प्रमाणात लोणावळा शहरात वर्दळ असते. पुणे-मुंबई व मुंबई- पुणे या मार्गावर जड-अवजड वाहनांना एक्सप्रेस हायवे रोड उपलब्ध असतानाही ही अवजड वाहने शहरातून ये-जा करताना शहरात वाहतूक कोंडीची व अपघाताची समस्या निर्माण होत असते. त्यासाठी लोणावळा शहरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाय योजना म्हणून जुना पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग ४ येथील खंडाळा एक्झिट ते वलवण एक्झिट दरम्यान सकाळी ६ वा. ते रात्री १० वाजेपर्यंत जड-अवजड वाहतूक कायम स्वरुपी बंद ठेऊन ही वाहतूक पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवरून सुरू ठेवणेत यावा आणि तशी अधिसूचना काढावी असा प्रस्ताव पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला होता.
हेही वाचा- आषाढी वारीसाठी ‘लालपरी’ सज्ज; पुणे विभागातून तब्बल ‘एवढ्या’ बसेस सोडणार
लोणावळा शहरात जड-अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाय योजना करणे आवश्यक असलेची खात्री करून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी पुणे, डॉ. सुहास दिवसे यांनी मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५ मधील तरतूदीनुसार व शासन गृह विभागाच्या दि.१९/०५/१९९० च्या अधिसुचनेनुसार लोणावळा शहरातील वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी उपाय योजना म्हणून जुना पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग
2 Comments