सत्य घटनांवर आधारित आहेत ‘या’ वेब सीरिज, सर्वांनी एकदा पाहायलाच हव्यात

सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मची लोकप्रियता चांगलीच वाढली आहे. प्रेक्षक नेहमी नवनवीन वेबसीरिज पाहण्यासाठी उत्सुक असतात. त्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्म देखील प्रेक्षकांसाठी विविध प्रकारचा कंटेट घेऊन येत असतो. कॉमेडी, हॉरर, एॅक्शन,सस्पेन्स, थ्रिलर, बोल्ड अशा वेगवेगळ्या विषयांवर आधारित वेब सीरिज ओटीटीवर प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. तसेच प्रेक्षकांची आवड आणि प्रतिसाद पाहता ओटीटी आता सत्य घटनांवर आधारित सीरिजही घेऊन येत आहे. तर आता आपण ओटीटीवर आलेल्या देशातील सत्य घटनांवर आधारित सीरिजबाबत जाणून घेणार आहोत.
1. स्कॅम 1992 – हर्षद मेहता स्टोरी – स्कॅम 1992- द हर्षद मेहता स्टोरी (SCAM 1992-The Harshad Mehta Story) ही वेब सीरिज चांगलीच गाजली आहे. या सीरिजला प्रदर्शित होताच प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. या सीरिजमध्ये अभिनेता प्रतीक गांधी याने मुख्य भूमिका साकारली आहे. या सीरिजमुळे प्रतीक गांधी चांगलाच प्रसिद्धीझोतात आला. ही सीरिज एका सामान्य घरातील गुजराती मुलाची आहे. जो शेअर बाजाराचा सम्राट म्हणून ओळखला जायचा. 1990 च्या दशकात हर्षद मेहता या व्यक्तीनं देशाच्या आर्थिक बाजारपेठेला हादरवून सोडलं होते. त्याच्याच जीवनावर आधारित ही सीरिज आहे.

2. जामतारा- सबका नंबर आएगा – जामतारा-सबका नंबर आएगा (Jamtara Sabka Number Ayega) या सीरिजला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता. ही सीरिज झारखंडच्या जामतारा या फिशिंग हबवर आधारित आहे. जामतारा येथे झालेल्या फसवणुकीच्या सत्य घटनांवर आधारित ही वेब सीरिज आहे. अनोळखी लोकांना फसवून त्यांचा खात्याचा तपशील मिळवून त्यांच्या खात्यातून पैसे स्वत:च्या खात्यात ट्रान्सफर केल्याच्या घटना या सीरिजमध्ये दाखवण्यात आल्या आहेत.

3. महाराणी – महाराणी (Maharani) ही वेब सीरिजही गाजलेल्या सीरिजपैकी एका आहे. ही सीरिज प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात आवडली होती. 90 च्या दशकातील बिहारमधील राजकीय गोंधळावर ही सीरिज आधारित आहे. यामध्ये अभिनेत्री हुमा कुरेशीने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. एक गृहिणी ते राजकारण असा प्रवास असलेल्या एका स्त्रीची स्टोरी यात दाखवण्यात आली आहे. तसेच सीरिजमध्ये हुमाचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळाला आहे.
