केसगळतीने त्रस्त आहात? न चुकता घ्या ‘हे’ 3 ज्यूस अन् झटकन समस्या करा दूर
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. या दिवसांमध्ये पावसात भिजलं की बहुतेक स्त्रियांना केसगळीतीची समस्या सतावत असते. यासोबत बदलती जीवनशैली, प्रदुषण या गोष्टींमुळेही केसगळीतीची समस्या निर्माण होताना दिसते. ही केस गळती थांबवण्यासाठी स्त्रिया अनेक वेगवेगळे उपाय करताना दिसतात, पण त्यांना हवा तसा रिझल्ट मिळत नाही. तर आता आपण काही अशा ज्यूसबाबत जाणून घेणार आहोत जे पिल्यानंतर तुमची केसगळतीची समस्या दूर होण्यास मदत होईल. चला तर मग नक्की हे ज्यूस कोणते आहेत याबाबत जाणून घेऊया.
1. बीटरूट ज्यूस – केसांसाठी लोह खूप गरजेचं असतं. केसांच्या समस्या जर तुम्हाला दूर करायच्या असतील तर त्यासाठी लोह असणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही बीटरूटचा ज्यूस प्या, यामुळे तुमची केसगळती कमी होण्यास मदत होईल. तसंच तुम्ही बीचरूटचे कापही खाऊ शकता.
2. आलुबुखार ज्यूस – आलुबुखार हे फळ खायला खूप चविष्ट लागतं. हे फळ जितकं चविष्ट आहे तितकंच त्यामध्ये अनेक गुणधर्मही आहेत, जे आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहेत. केसगळती थांबवायची असेल तर तुम्ही आलुबुखारचा ज्यूस प्या. हा ज्यूस आठवड्यातून दोन वेळा प्या यामुळे तुमची केसगळती थांबण्यास मदत होईल.
3. आवळ्याचा ज्यूस – आवळा हा शरीरासाठी आरोग्यदायी मानला जातो. कारण आवळ्यामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे आपल्या शारिरीक समस्या दूर करण्यात मदत करतात. यामध्येच आवळा आपल्या केसांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. जर तुम्हाला केस गळतीचा त्रास सतावत असेल तर तुम्ही आवळ्याचा ज्यूस प्या यामुळे तुमची केस गळती थांबण्यास मदत होईल आणि तुमचे केस मजबूत होतील.