ताज्या बातम्या

मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याचे आरोग्यदायी फायदे

Salt Bath : मीठ हे रोजच्या वापरातील महत्त्वाचा पदार्थ आहे. जेवणात जर मीठ नसेल तर पदार्थाची चव बिघडून जाते.  मीठाच्या अतिसेवणामुळे ब्लड प्रेशर वाढत असले तरीही मात्र मीठ आरोग्यासाठी महत्वाचे आहे. मिठात असे अनेक गुण असतात जे आपल्या शरीराला फायद्याचे असतात. मग त्यामध्ये मीठाच्या पाण्याने अंघोळ केल्याचे अनेक फायदे आहेत. हा सोपा उपाय जर तुम्ही करुन पाहीला तर तुम्ही अनेक आजारांपासुन दूर राहु शकता.

सांधेदुखी होईल कमी

मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्यास सांधेदुखीही कमी होते. आंघोळ करताना पाण्यात चिमूटभर मीठ टाकले तर हाडांमधील किरकोळ दुखणे दूर होते. याशिवाय जर पायात खूप दुखत असेल तर कोमट मिठाच्या पाण्याने पाय धुतल्यास नक्कीच फायदा होईल.

संसर्गही कमी होईल

कोणत्याही प्रकारचे संसर्ग दूर करण्यासाठी मिठाचे पाणी खूप उपयुक्त आहे. वास्तविक, मिठात असलेले खनिजे अनेक प्रकारच्या संसर्गापासून संरक्षण करतात. मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने शरीरातील सर्व छिद्रे उघडतात आणि शरीरातील संसर्गाचा धोका कमी होतो.

रोगप्रतिकारक क्षमता वाढते

आंघोळीच्या गरम पाण्यात मीठ मिसळून आंघोळ केल्यामुळे शरीरात स्फूर्ती टिकून राहतो आणि उत्साह टिकून राहतो, आपल्याला रिफ्रेशींग वाटते. तसंच या पाण्याने रोज आंघोळ केल्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यात मदत होते.

डेड स्किनसाठी फायदेशीर

मीठ टाकून आंघोळ केल्यामुळे त्वचेत मॅग्नेनेशियमचं प्रमाण संतुलित राहतं. मीठ आणि इसेन्शिअल ऑईलच्या मिश्रणाने  त्वचा सॉफ्ट आणि सुंदर राहते. हे मिश्रण आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने डेड स्किनपासून बचाव करू शकता.

पिंपल्सपासून संरक्षण

एक कप पाण्यात एक चमचा समुद्री मीठ आणि कापसाचा वापर करून हे मिश्रण तुम्ही चेहऱ्याला लावू शकता किंवा हे मिश्रण आंघोळीच्या पाण्यात टाकाल्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे पिंपल्सपासून तुम्ही तुमचा बचाव करू शकता.

वजन कमी होण्यासाठी मदत

मीठ आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ केल्यामुळे वजन कमी होण्यासाठी मदत होते. त्यामध्ये आल्याचे तुकडे, एक चमचा ईप्सम सॉल्टमध्ये टाकून मिश्रण घ्यायचे. हे मिश्रण आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ केल्यामुळे तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता.

ताण कमी होतो

कोणत्याही गोष्टीचा खूप ताण येत असल्यास मिठाच्या पाण्याने आंघोळ जरूर करावी. मिठाच्या पाण्यात असलेली खनिजे शरीरात शोषली जातात. सोडियमचा मेंदूवरही परिणाम होतो, असे मानले जाते. याशिवाय बॉडी डिटॉक्स झाल्यावर शरीरातील ताणही निघून जातो. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये