आरोग्यताज्या बातम्याफिचर

खारीक खाण्याचे फायदे वाचाल तर, तुम्हीही ‘खारीक प्रेमी’ व्हाल..

Benefits of eating Khareek : धष्टपुष्ट शरीरासाठी खारीक अत्यंत उपयुक्त फळ आहे. खारकेचे सेवन खूप पौष्टिक मानले जाते. जर तुमची पचनशक्ती चांगली असेल तर खारीक जास्त प्रमाणात खाणे फायदेशीर ठरते. खारकेचे सेवन वर्षभर केले जाऊ शकते, कारण हे फळ वाळलेल्या स्वरुपात बाजारात वर्षभर उपलब्ध असते.

खारीक खाल्ल्यास शरीराला विविध फायदे होतात. विशिष्ट जातीचा खजूर वाळवून खारीक तयार केली जाते. संस्कृत; तसेच हिंदीत खर्जुरी, मराठीत खारीक, तर इंग्रजीत ड्राय डेट असे म्हणतात.खारीक ही खजुराची बहीण असली तरी स्त्रियांच्या आरोग्यासंबंधात तिचं स्थान विशेष आहे. स्त्रियांच्या सर्व तक्रारींवर विशेषत: प्रसूतीनंतर खारीक आहारात असायला हवी असं सांगतात.

खारीक खाण्याचे फायदे :
1. नियमित 2-3 खारीक दूधात उकळून प्यायल्यास वीर्यनिर्मितीस चालना मिळते. खारीकातील मॅग्नेशियम घटक शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. खारकेत भरपूर फायबर, जीवनसत्त्व बी १, बी २, बी ३,बी ५ असून पोटॅशियमही आहे. खारकातील बिया काढून दुधामध्ये केळासोबत नियमित सेवन केल्यास वृद्धपणाशी संबंधित समस्या दूर राहतील.

2. खारीक नियमित खाल्ल्यास दमा असणार्या रुग्णांना आराम मिळेल. अर्धांगवायू आणि हृदयविकाराचा त्रास खारकाच्या सेवनाने कमी होईल. खारीक खाल्ल्यानंतर भूक वाढवण्यासाठी मदत होते व अन्न व्यवस्थित पचते.
सर्दीने त्रस्त असाल तर खारीक उकळलेल्या दुधामध्ये विलायची पूड टाकून सेवन करा. सर्दी लवकर बरी होईल.

3. खारीक सर्दी, पडसे, खोकल्यामुळे त्रास होत असल्यास रुग्णांसाठीदेखील खारीक फायदेशीर आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे खारीक पुरुषांमधील नपुंसकता दूर करण्याचा रामबाण उपाय आहे. खारीक नियमित खाल्ल्यास हृदयविकार होत नाहीत. शरीरातील रक्ताची कमतरता खारकाच्या सेवनाने दूर होईल. खारीक हाडांसाठी पोषक असते. पाठीचा कणा व सांधे यांची झीज होणे, अशक्‍ततेमुळे कंबर दुखणे वगैरे त्रासांवर खारकेची पूड उपयुक्‍त असते.

4. मधूमेहींसाठी खारीक गुणकारी ठरते. त्यामधील नैसर्गिक गोडवा रक्तातील साखरेमध्ये अचानक होणारे बदल नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. बद्धकोष्ठतेचा त्रास असणार्‍यांनाही खारीक फायदेशीर ठरते. यामध्ये पोटॅशियम घटक मुबलक असतात. 

5. पचनाचा त्रास, डायरिया, पोटदुखी अशा समस्यांवर खारीक आणि दूध फायदेशीर आहे. खारीकातील पोटॅशियम, कॅल्शियम, कॉपर, मिनरल्स, मॅगनीज, सेलेनियम असे घटक मुबलक प्रमाणात आढळतात. हाडांना बळकटी देण्यासाठी खारीक आणि दूध फायदेशीर आहे. खारीकमधील फायबर घटक कोलोन कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत करतात.

6. खारीक लहान मुलांचे दात बळकट करण्यासाठी मदत करते. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये