“माझ्यासारखा भिकारी तर…”, पंतप्रधान मोदींचं नाव घेत राज्यपाल कोश्यारींचं वक्तव्य!

मुंबई : (Bhagat singh koshyari On narendra modi) महाराष्ट्राचे राज्यापाल भगतसिंग कोश्यारी गुरुवार दि. 29 रोजी नागपूरमधील सुरेश भट सभागृहात आयोजित भारत विकास परिषदेच्या संमेलनात बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचा उल्लेख करत, “सर्वांनी मदत, संपर्क आणि सेवा या तीन गोष्टी केल्या, तर मोदींना वाटतं त्याआधीच भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियनची होईल. यात माझ्यासारखा भिकारी तर काहीच करू शकत नाही” असं कोश्यारींनी मद व्यक्त केलं आहे.

पुढे बोलताना कोश्यारी म्हणाले, “आर्थिक दृष्टीने आपण पाचव्या क्रमांकावर आलो आहोत. भारत विकास परिषदेत देशभरातील चांगले लोक आहेत. जो चांगला वकील आहे, चांगला डॉक्टर, चांगला दुकानदार असे सर्व लोक एकत्र बसतात, योजना तयार करतात. तसेच योजना करून देशभरात सेवेचं काम करतात. आपण ते काम किती पुढे नेऊ शकतो यासाठी प्रयत्न करायला हवे,” असं मत भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केलं.

कोश्यारी म्हणाले, “आपण जेव्हा कुटुंबाविषयी विचार करतो की, मुलाला आयएएस बनवायचं आहे, सध्या दोन कारखाने आहेत, तर १० कारखाने असावेत. जेव्हा आपण अशी इच्छा बाळगतो तेव्हा कारखानाही तयार होतो आणि मुलगा आयएएसही बनतो,” असंही कोश्यारींनी नमूद केलं.

Prakash Harale: