पहिल्यांदा आमदार ते थेट मुख्यमंत्री, कोण आहेत राजस्थानचे नवे CM भजनलाल शर्मा?
Bhajanlal Sharma News CM : राजस्थानमध्ये भाजपचा गुजरात पॅटर्न पाहायला मिळाला. भाजपने राजस्थानमध्ये मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा केली आहे. राजस्थानचे नवे मुख्यमंत्री म्हणून भजनलाल शर्मा यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच आमदार झालेल्या भजनलाल शर्मा यांना भाजपच्या पक्षश्रेष्ठीने थेट मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान केलं आहे.
विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर भाजपने ही घोषणा केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. तसेच दिया कुमारी आणि प्रेम चंद बैरवा यांच्या नावाची उपमुख्यमंत्री पदासाठी घोषणा करण्यात आली.
राजस्थानच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर बरीच चर्चा सुरू होती. मध्य प्रदेशातील मोहन यादव यांच्याप्रमाणे भाजप मुख्यमंत्री म्हणून नव्या नावाची घोषणा करू शकते, असे बोलले जात होते. त्यानुसाप भाजपमे नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे.
जयपूरच्या सांगानेरसारख्या जागेवरून भाजपने त्यांना पहिल्यांदाच उमेदवारी दिली होती. आधीच्या आमदाराचे तिकीट रद्द करून भजनलाल शर्मा यांना उमेदवारी दिली. सांगानेर ही जागा भाजपचा बालेकिल्ला मानली जाते. भजनलाल शर्मा यांनी काँग्रेसच्या पुष्पेंद्र भारद्वाज यांचा ४८०८१ मतांनी पराभव केला.