ताज्या बातम्या

स्टेजवर विवस्त्र नृत्य, किस अन्… भंडाऱ्यात डान्स हंगामाच्या नावावर अश्लीलता

Obscene Dance in Bhandara : भंडारा जिल्ह्यातील (Bhandara) तुमसर तालुक्यात गोबरवाही या गावात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अश्लील डान्सचा हैदोस घालण्यात आल्याचं समोर आलं. या कार्यक्रमात अश्लीलतेचा कळस गाठण्यात आल्याचं दिसून आलं. त्यासंबंधित एक व्हिडीओ व्हायरल (Bhandara Viral Video) होत आहे. पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून या प्रकरणात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. राकेश सिंग सोलंकी (हेड कॉन्स्टेबल) आणि राहुल परतेती (पोलीस कॉन्स्टेबल) अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

या प्रकरणी गोबरवाही पोलिसांनी नागपूर आरके हंगामा ग्रुपच्या पाच जणांवर आणि कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या आणि अश्लील व्हिडिओ पसरवणाऱ्या पाच जणांविरुद्ध कलम ३५४, ३५४ ब, २९४, ५०९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे. कार्यक्रमाला हजर असतानाही कर्तव्यात कसूर करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून अधिक तपास भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल करत आहेत.

दिवाळीनंतर भाऊबीजेच्या दिवसापासून भंडारा जिल्ह्यात मनोरंजनासाठी गावोगावी नाटके, डान्स हंगामा, लावणीचे कार्यक्रम आयोजित केले जातात. तर भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील नाकडोंगरी येथे डान्स हंगामाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने नागपूर येथील एका डान्स ग्रुपला बोलवण्यात आले होते. डान्स करत असताना अचानक मुलींच्या शरीरावरील कपडे काढत नग्न अवस्थेत अश्लील डान्स सादर करण्यात आला.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिसांनी आयोजकांसह इतर जणांवर गोबरवाही पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. तर प्रत्येक कार्यक्रमात दोन पोलिस कर्मचारी उपस्थित असताना देखील अश्लीलता गाठली गेल्यामुळे पोलिसांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये