“…तर भारत जोडो यात्रा थांबवावी”, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचं राहुल गांधींना पत्र

मुंबई | Mansukh Mandaviya – देशातलं कोरोना (Corona Virus) संकट निवळत चाललं होतं. मात्र, आता पुन्हा एकदा या जीवघेण्या व्हायरसचं संकट घोंगावू लागलंय. चीन आणि पूर्व आशियामध्ये देखील कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे भारतानं सावध होत उपाययोजना आखायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया (Mansukh Mandaviya) यांनी राहुल गांधींना (Rahul Gandhi) पत्राद्वारे ‘भारत जोडो यात्रा’ (Bharat Jodo Yatra) थांबवण्याचं आवाहन केलं आहे.
मंत्री मनसुख मांडवीया (Mansukh Mandaviya) यांनी राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (CM Ashok Gehlot) यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी भारत जोडो यात्रेत कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. तसंच यात्रेदरम्यान नियमांचं पालन करता येत नसेल तर भारत जोडो यात्रा थांबवावी, असं देखील मांडवीया यांनी पत्रात म्हटलं आहे.
मनसुख मांडवीया यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, कोरोना महामारी ही सार्वजनिक आपत्ती आहे. त्यामुळे देशहितासाठी भारत जोडो यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेता येईल. राजस्थानमध्ये सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेत कोरोनाच्या नियमांचं पालन करावं. तसंच यात्रेदरम्यान सर्वांनी मास्क आणि सॅनिटायजरटचा वापर करावा. फक्त कोरोना वॅक्सीन घेतलेल्या नागरिकांना भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याची परवानगी द्यावी.
दरम्यान, कोरोनामुळे चीनमध्ये मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत. त्यामुळे भारतानं सावध होत उपाययोजना आखायला सुरुवात केली आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचं जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात यावं, अशा सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सर्व राज्यांना दिल्या आहेत. तसंच आज (21 डिसेंबर) केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. फक्त चीनच नव्हे तर जपान, दक्षिण कोरिया, ब्राझिल आणि अमेरिका या देशांमध्ये देखील कोरोनाचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे.
3 Comments