ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“अजित पवारांना मुख्यमंत्री करा, मी पाठिंबा देतो अन्…”, भास्कर जाधवांचं भाजपला आव्हान

नागपूर : (Bhaskar Jadhav On Ajit Pawar) अजित पवार यांना मुख्यमंत्री करा. मी पाठिंबा देतो आणि सभागृहात ठराव मांडतो. मला तुमचं दम बघायचा आहे. माझ्या पक्षाची हमी मी घेतो, असं आव्हान शिवसेना ( ठाकरे गट ) भास्कर जाधव भाजपाला दिलं आहे. ज्याच्याबरोबर मैत्री कराल, त्याचं वाटोळं केल्याशिवाय राहत नाही, अशी टीकाही भास्कर जाधवांनी भाजपावर केली आहे. ते विधानसभेत बोलत होते.

“अजित पवार महाविकास आघाडी सरकारमध्ये होते. पण, काहींना सकाळ संध्याकाळ अडीच वर्षे खूप खुपत आहेत,” असं विधान भास्कर जाधवांनी केलं. त्यावर, “अजित पवारांना मुख्यमंत्री केलं असतं, सगळंचं खुपलं असतं,” असं वक्तव्य विधानसभेत एका सदस्यानं केलं.

“मला तुमच्यात दम बघायचा आहे”
याला प्रत्युत्तर देताना भास्कर जाधव म्हणाले, “आता अजित पवारांना मुख्यमंत्री करा. मी पाठिंबा आणि सभागृहात ठराव मांडतो. मला तुमच्यात दम बघायचा आहे. माझ्या पक्षाची हमी मी घेतो. ज्याच्याबरोबर मैत्री कराल, त्यांचं वाटोळं केल्याशिवाय राहत नाही.”

“भाजपामुळे करोना आला आणि महाराष्ट्र ठप्प झाला”
“भाजपाला सतत अडीच वर्षे… अडीच वर्षे दिसतात… भाजपानं करोना आणला. का करोना आणला? का वेळेवर विमानांची उड्डाणे बंद केली नाहीत. तिकडे झोपाळ्यावरून बसून ढोकळा आणि फापडा खात बसले आणि मग देश बंद केला. भाजपामुळे करोना आला आणि महाराष्ट्र ठप्प झाला,” असं टीकास्र भास्कर जाधवांनी सोडलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये