भास्कर जाधव पुन्हा गरजले, अन् विरोधकांवर बरसले, म्हणाले; “एकदा भूमिका घेतल्यानंतर मी…”

रत्नागिरी : (Bhaskar Jadhav On Nitesh Rane) ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आज चिपळूणमध्ये पोहोचले. यावेळी त्यांचे शिवसैनिकांनी जंगी स्वागत केलं. जाधव पुन्हा एकदा गरजले अन् विरोधकांवर बरसले, ते म्हणाले, एकदा भूमिका घेतल्यानंतर मी कधीही दुष्परिणामांची चिंता करीत नाही, अशा खास शैलीत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पोलिस प्रशासनाने त्यांचे संरक्षण काढून घेतल्यानंतर अवघ्या काही तासातच भास्कर जाधव यांच्या चिपळून येथिल घरावर रात्रीच्या वेळी हल्ल्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या घराबाहेर काही संशयास्पद वस्तूदेखील आढळल्या आहेत. याशिवाय भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी विखारी शब्दांमध्ये जाधवांवर टीकास्र सोडलं. आज निलेश राणेंनीही त्यांना टार्गेट केल्याचं दिसून आलं.
यावेळी बोलतांना जाधव म्हणाले की, मागील काही दिवसांपासून आमच्या पक्षप्रमुखांवर खालच्या स्तरावर टीका केली जात आहे. आमचे ४० सहकारी सोडून गेले. भाजपने शिवसेना पक्ष संपवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे शिवसैनिक आतल्या आत तळपत आहे. उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना शांत राहण्याचं आवाहन करीत आहेत. परंतु आता शिवसैनिक डरकाळी फोडण्याच्या तयारीत असल्याचं भास्कर जाधव यांनी सांगितलं.
एकदा भूमिका घेतल्यानंतर आपण परिणामांची चिंता करीत नाही, असं भास्कर जाधवांनी यावेळी ठणकावून सांगितलं. भाजप नेते आणि भास्कर जाधव यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून वाक् युद्ध सुरु आहे. आरोप-प्रत्यारोप करतांना उभय पक्षांकडून एकमेकांवर खालच्या स्तरावर बोललं जात आहे.