“रामदास कदमांना वेड्यांच्या रूग्णालयात…”, शिवसेना नेत्याचं खळबळजनक विधान

मुंबई | Bhaskar Jadhav On Ramdas Kadam- एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेनेसोबत बंडखोरी करून 40 आमदारांसह भाजपसोबत हातमिळवणी केली. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पाठिंब्यावर राज्यात नवं सरकार स्थापन झालं. तसंच आमदारांनी केलेल्या बंडाळीनंतर शिवसेना पक्षात फूट पडली. त्यामुळे शिंदे गट आणि शिवसेना नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे. याच दरम्यान, रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केलेल्या टीकेनंतर त्याला प्रत्युत्तर देताना शिवसेना नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांची जीभ घसरली आहे. रामदास कदमांना वेड्याच्या रुग्णालयात दाखल करायला हवं, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे.

मुंबईतील शौचालयांमध्ये जेवढी घाण नाही, तेवढी घाण रामदास कदम यांनी ओकली आहे. तसंच माझे वडील गेल्यानंतर अनेक नेते मला भेटायला आले. गिते, तटकरे, मुश्रीफ आले. त्यांच्या मी पाया पडलो. रामदास कदम यांच्याही पाया पडलो. त्याचा अर्थ त्यांनी वेगळा काढला. त्यांना काही वैचारिक पातळी आहे की नाही?, असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे. रामदास कदम यांच्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे शिंदे यांनी त्यांना तात्काळ पदावरून हटवलं पाहिजे, अशी मागणी देखील जाधव यांनी केली आहे.

दरम्यान, रामदास कदम यांनी दापोलीत आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलताना ठाकरे कुटुंबावर खोचक टीका केली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मुख्यमंत्री असताना ते कुठेही गेले तरी रश्मी वहिनी त्यांच्यासोबत असायच्याच. माँसाहेब मीनाताई ठाकरे या आयुष्यात कधीही व्यासपीठावर चढल्या नाहीत. तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना केवळ तीनवेळा मंत्रालयात गेले होते. तसंच आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यापेक्षा भरत गोगावले यांना मंत्रिपदं दिलं असतं. पण वडील मुख्यमंत्री झाल्यावर आदित्य ठाकरे यांना लगेचच कॅबिनेट मंत्री व्हायचं होतं. एवढचं कशाला, तर रश्मी ठाकरे यांचाही मंत्रिमंडळात कसा समावेश झाला नाही, याचं मला आश्चर्य वाटतं, अशी खोचक टीका रामदास कदम यांनी केली आहे.

Sumitra nalawade: