ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

उद्धव ठाकरेंचे हात आणखी बळकट! शिवसेनेच्या जुन्या शिलेदाराच्या हाती पुन्हा शिवबंधन

मुंबई : (Bhausaheb Wakchaure joins Shivsena) शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांसह आज (२३ ऑगस्ट) उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मुंबईतील मतोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवसस्थानी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी वाकचौरे यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधलं.

यावेळी बोलताना वाकचौरे म्हणाले, शिवसेना आता फक्त महाराष्ट्रात नाही तर दिल्लीच्या तख्तापर्यंत नेऊन पोहचवायची आहे. सुबह का भूला शाम को वापस लौटता आहे तो उसे भूला नही कहते. तो मी आहे. मी घर वापसी केली आहे. मी काहीही चूका केल्या असल्या तरी मी घर वापसी केली आहे. तो अपराध मी मान्य करून परत आलो आहे असेही वाघचौरे म्हणाले.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, काही दिवसांपूर्वी भाऊसाहेब मला भेटले मी त्यांना शिवसैनिकांची माफी मागा असं सांगितलं. ते म्हणाले मी चुक केली आहे त्यामुळे मी तुमची आणि मातोश्रीची माफी मागतो. आपण राजकारणात पक्षांतरं पाहिले, पण सध्या पक्ष संपवण्याचं कटकारस्थान आपण पहिल्यांदा पाहतोय. तुम्ही सगळे शिवसैनिक दिलदार आहात. जर एखादा चुकला आणि पश्चाताप व्यक्त केला तर शिवसैनिक त्यांना माफ करतो. शिवैनिक चुकीला माफी देतो पण पापाला माफी देत नाही, असं त्यांनी सांगितलं.

कोण आहेत भाऊसाहेब वाकचौरे

भाऊसाहेब वाकचौरे हे 2009 साली रामदास आठवले यांचा पराभव करून शिवसेनेकडून खासदार झाले होते. 2014 साली उमेदवारी जाहीर होऊन देखील वाकचौरे यांनी शिवसेना सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर सलग दोन वेळा लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर काँग्रेस, भाजप असा प्रवास करून भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये