ताज्या बातम्यामनोरंजन

अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या आत्महत्येनंतर कथित बॉयफ्रेंडच्या पोस्टची होतेय चर्चा

Akanksha Dubey Suicide : सिनेसृष्टीतील कलाकारांनी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना समोर येत आहे. भोजपूरी इंडस्ट्रीतल्या लोकप्रिय अभिनेत्री आकांक्षा दुबे (Akanksha Dubey) हिनं आत्महत्या केली आहे. आकांक्षाच्या आत्महत्येनं भोजपूरी इंडस्ट्री हादरली आहे. आकांक्षाच्या आत्महत्येनंतर तिच्या कथित बॉयफ्रेंडने पोस्ट शेअर करत श्रद्धांजली व्यक्त केली आहे.

समर सिंह (Samar Singh) हा आकांक्षाचा कथित बॉयफ्रेंड आहे. तो भोजपुरी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता व गायक आहे. या जोडीने अनेक भोजपुरी म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र काम केले आहे. ‘निशब्द आकांशा दुबेच्या आत्म्यास शांती लाभो’ अशा शब्दात त्याने भावना व्यक्त केल्या आहेत.. गेल्या महिन्यात, आकांक्षा दुबेने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर समर सिंहबरोबरचा फोटो शेअर केला होता. दोघांनी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी नात्याबद्दल खुलासा केला होता अशी चर्चा आहे.

आकांक्षा ही मूळची मध्य प्रदेशातील मिर्जापूची रहिवाशी आहे. तीन वर्षांची असताना ती स्वप्ननगरी मुंबईत आली होती. इन्स्टाग्राम व टिकटॉकवर रील बनवून आकांक्षा प्रसिद्धीझोतात आली. लहानपणापासूनच अभिनय व नृत्याची आवड होती. परंतु भोजपुरी मनोरंजनसृष्टीत काम करणं सोपं नसल्याचं आकांक्षाने एका मुलाखतीत सांगितलं होतं. काम मिळत नसल्याने आकांक्षा 2018 मध्ये नैराश्यात गेली होती. तिने मनोरंजनविश्वापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, आईच्या सांगण्यावरुन तिने पुन्हा भोजपूरी इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला होता.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये