ताज्या बातम्यापुणे

२५ हजार विद्यार्थ्यांना मिळणार पोषक आहार; डॉइश बँक आणि अक्षय पात्र फाउंडेशचा पुढाकार

डॉइश बँक आणि अक्षय पात्र फाउंडेशनने पुण्यातील शिवाजीनगर येथे विद्यार्थ्यांना पोषक आहार पुरवित आरोग्य, शिक्षण व आर्थिक वाढीला हातभार लावण्यासाठी अद्ययावत किचनचे भूमिपूजन केले. या नाविन्यपूर्ण केंद्राच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम म्हणजे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या माध्यमातून समाजाच्या वंचित गटातील मुलांच्या आयुष्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठीच्या या संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांच्या वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. अक्षय पात्र फाउंडेशन ही संस्था पीएम पोषण उपक्रमाच्या अंमलबजावणीतील भागीदार व एनजीओद्वारे चालविला जाणारा जगातील सर्वात मोठा शालेय भोजन उपक्रम आहे.

२०२६ च्या सुरुवातीस कार्यान्वित होणार असलेले हे बहुमजली किचन संपूर्ण पुण्यातील सरकारी आणि सरकारी अनुदानप्राप्त शाळांतील २५,००० विद्यार्थ्यांना दररोज गरम, पौष्टिक भोजन पुरविणार आहे. समाजाच्या दुर्लक्षित स्तरातील मुलांची शाळेतील उपस्थिती, त्यांची शैक्षणिक कामगिरी आणि एकूण आरोग्य व स्वास्थ्यामध्ये सुधारणा घडवून आणणे हे या उपक्रमाचे लक्ष्य आहे. या केंद्रामध्ये स्वच्छता आणि सुरक्षेचा उच्चतम दर्जा राखला जाईल व ते अक्षय पात्रचे पुण्यातील मध्यवर्ती किचन म्हणून कार्यरत राहील. पोषण व शिक्षणाच्या समस्येवर उपाय शोधण्यापलीकडे जात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी व स्थानिक शेतीला पाठबळ पुरवित समाजाच्या आर्थिक विकासाला खतपाणी घालण्यासाठीही हा प्रकल्प सज्ज आहे.

या कार्यक्रमा प्रसंगी डॉइश बँक ग्रुप, इंडियाचे सीईओ कौशिक शपारिया यांच्यासह अक्षय पात्र फाउंडेशनच्या पुण्याचे रिजनल प्रेसिडंट संपती दास, अक्षय पात्र फाउंडेशनचे सीईओ श्रीधर व्यंकट, प्रवीण एनआर (आयएफएस), पृथ्वीराज बीपी (आयएएस) व पुणे सरकारी विभागाचे तसेच अक्षय पात्र फाउंडेशन इतर वरीष्ठ प्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते.

अक्षय पात्र फाउंडेशनचे सीईओ श्रीधर वेंकट म्हणाले, “आजचा भूमीपूजनाचा सोहळा म्हणजे वर्गखोल्यांतील भूकेचे निवारण करण्यासाठी आणि संपूर्ण पुण्यातील मुलांसाठी शैक्षणिक संधी निर्माण करण्यासाठी डॉइश बँकेच्या साथीने सुरू असलेल्या आमच्या प्रवासातील एक लक्षणीय टप्पा आहे. या ‘स्टेट-ऑफ आर्ट’ किचनच्या माध्यमातून आम्ही आमच्या कार्यान्वयन क्षमता लक्षणीयरित्या वाढविण्यास सज्ज आहोत व त्यायोगे प्रत्येक शालेय दिवशी २५,००० हून अधिक मुलांना पौष्टिक भोजन पुरविले जाईल याची काळजी आम्ही घेणार आहोत. हा उपक्रम केवळ शैक्षणिक सर्वोत्कृष्टतेला पाठबळ पुरवित नाही तर अधिक चांगल्या आरोग्याचा पुरस्कार करून व स्थानिक पातळीवर आर्थिक संधी निर्माण करून आपल्या समजाची वीण अधिक घट्ट करतो. डॉएच बँकेकडून गेल्या अनेक वर्षांपासून आम्हाला मिळत आलेल्या पाठबळासाठी आम्ही त्यांचे अत्यंत ऋणी आहोत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये