सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील 50 हजार गोविंदांना देणार विमाकवच
मुंबई | दहिहंडी उत्सवानिमित्त राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. दहिहंडी उत्सव आणि प्रो गोविंदा लीगदरम्यान राज्यातील 50 हजार गोविंदांना विमाकवच देण्याचा निर्णय राज्य सरकानं घेतला आहे. सरकारनं घेतलेल्या निर्णयानुसार जर गोविंदाचा अपघाती मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबीयांना 10 लाख रूपये देण्यात येणार आहेत.
राज्य सरकारकडून 50 हजार गोविंदांना विमाकवच देण्यात येणार आहे. यासाठी ओरिएन्टल इन्शुरन्स विमा कंपनीची निवड करण्यात आली आहे. तसंच 37 लाख 50 हजार रूपयांचा निधी दहीहंडी समन्वय समितीला वितरित करण्याचा निर्णय सरकानं जाहीर केला आहे.
सरकारच्या या निर्णयानुसार, गोविंदाचा अपघातील मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबीयांना 10 लाख रूपये देण्यात येणार आहेत. तसंच गोविंदाला कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 10 लाख, एक पाय किंवा डोळा गमावल्यास 5 लाख आणि कायम पक्षपाती अपंगत्व असल्यास विमा पॉलिसीमध्ये नमूद करण्यात आलेल्या टक्केवारीनुसार मदत करण्यात येणार आहे.