ताज्या बातम्यामनोरंजन

“बाप होण्यासाठी…”, अभिनेता रणबीर कपूरचा मोठा खुलासा

मुंबई | Big Revelation Of Ranbir Kapoor – बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्टनं काही दिवसांपूर्वीच तिच्या चाहत्यांना गुड न्यूज दिली होती. तेव्हापासून रणबीर कपूर अणि आलिया भट्ट सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. तसंच याच पार्श्वभूमीवर रणबीरनं आपल्याला बाप होण्याची घाई का झाली होती याचं कारण सांगितलं आहे. एका मुलाखतीमध्ये रणबीरला बाप होण्यात फार घाई झाली का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्याने दिलेलं उत्तर चांगलंच चर्चेत आलं आहे.

वयाची चाळीशी पार केल्यानंतर येणाऱ्या अडचणी त्रासदायक ठरतात. मला ते नको होतं. तुम्ही जर त्या वयामध्ये पिता होण्यासाठी पाऊले उचलता तेव्हा मात्र वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. हे तेव्हाच होते जेव्हा पुरुषानं त्याच्या वयाची चाळीशी पार केलेली असते. तुम्ही विचार करता का, त्यावेळी माझ्या मुलाचे वय हे 20 वर्षे असेल आणि मी 60 वर्षांचा असेल. आता तुम्ही मला सांगा मी काय त्याच्याबरोबर खेळु शकेल, कुठे फिरायला जाऊ शकेल. हे कारण रणबीरनं सांगितलं आहे.

https://www.instagram.com/p/CfS-_HvMhQ8/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, समशेराचे दिग्दर्शक करण मल्होत्रानं सांगितलं की, रणबीरनं आपल्याला दीड वर्षांपूर्वीच एक गोष्ट सांगितली होती. ती म्हणजे त्याला लवकर गुड न्युज हवी होती. बाप होण्यासाठी रणबीर फारच उत्सुक होता. तसंच सध्या तो खूप आनंदात आहे. त्याचे कारण आलियाची गुड न्यूज. मला आठवतं की, मी जेव्हा माझ्या गोड बातमीविषयी सांगितलं होतं तेव्हा त्यानं देखील मला त्याच्या आणि आलियाच्या बाळाबाबत सांगितलं होतं. मी त्याला शुभेच्छा दिल्या होत्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये