सुशांतच्या आठवणीत अंकिता लोखंडे भावुक; म्हणाली, “त्याचा अभिमान वाटतो”
Bigg Boss 17 : छोट्या पडद्यावरील वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या 17 व्या (Bigg Boss 17) पर्वाची जोरदार चर्चा सुरू आहे. हे पर्व सुरू झाल्यापासून स्पर्धकांनी घर अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. यामुळे प्रेक्षकांचाही यंदाच्या बिग बॉस पर्वाला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. अशातच हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) नुकतीच सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आठवणीत भावुक झाल्याचं पाहायला मिळाली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.
सुशांतच्या आठवणीत अंकिता लोखंडे भावूक
अंकिता लोखंडेने अभिषेक कुमार (Abhishek Kumar) गप्पा करताना दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतबद्दल (Ankita Lokhande On Sushant Singh Rajput) भाष्य केलं आहे. ‘बिग बॉस 17’चा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता ‘बिग बॉस 17’मधील गार्डन एरियामध्ये बसलेली दिसत आहे. त्यावेळी तिच्यासोबत अभिषेक कुमारदेखील आहे.
सुशांतच्या आठवणीत भावूक होत अंकिता लोखंडे म्हणाली,”सुशांत खूप मेहनती होता. सुशांतच्या संघर्षाला तोड नाही. एका वेगळ्या प्रकारचा संघर्ष त्याने केला आहे”. सुशांतच्या आठवणीत अंकिता लोखंडेला अश्रू अनावर झाले आहेत. अंकिताला अश्रू अनावर झाल्याने अभिषेक तिला म्हणतो की,”सुशांत सिंह राजपूतबद्दल तुझ्यासोबत मी कधीही बोलणार नाही, असं मी ठरवलं होतं”. यावर अंकिता म्हणते,”या विषयावर बोलायला मला आवडतं. ते दिवस आठवतात. त्याचा अभिमान वाटतो”.
https://www.instagram.com/reel/CzWaypZvNlo/?utm_source=ig_web_copy_link