ताज्या बातम्यामनोरंजन

खानजादीनं घेतला सलमान खानशी पंगा, अभिनेता चांगलाच संतापला; म्हणाला, “जा घरी…”

मुंबई | Bigg Boss 17 : सध्या ‘बिग बॉस 17’ (Bigg Boss 17) हा शो चांगलाच चर्चेत आहे. यंदाच्या पर्वात देखील सहभागी झालेले स्पर्धक प्रेक्षकांचं मोठ्या प्रमाणात मनोरंजन करताना दिसत आहेत. त्यात बिग बॉसच्या घरातील विकेंडचा वार पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. तर आजच्या विकेंडच्या वारचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये खानजादीनं (Khanzaadi) सलमान खानशी (Salman Khan) पंगा घेतल्याचं दिसत आहे. तसंच सलमान देखील खानजादीवर चांगलाच संतापल्याचं दिसत आहे.

आजच्या विकेंड वारच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे की, खानजादी जिग्ना बोराला म्हणते की, माझ्या तब्येतीबाबत मजाक करू नका. यावर सलमान खान म्हणतो की इथे कोणीच तुझ्या तब्येतीबाबत मस्करी करत नाहीये. उलट तुच तुझ्या तब्येतीबाबत नेहमी बोलत असते. त्यानंतर सलमानचं हे बोलणं ऐकून खानजादी रडते आणि म्हणते मला घरी जायचं आहे.

मला घरी जायचं आहे, असं खानजादी म्हणते अन् सलमान खान तिच्यावर चांगलाच संतापतो. सलमान खानजादीला थेट म्हणतो की, तुला घरी जायचं आहे ना..जा मग आता घरी. त्यानंतर खानजादी जोरात ओरडते आणि रडते.

https://www.instagram.com/reel/C0DzRm6yBP6/?utm_source=ig_web_copy_link

सलमान खानला खानजादीचं वागणं आवडलं नसल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे. त्यामुळे आज खानजादी खरच घरी जाणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान, आजच्या विकेंडच्या वारचा हा प्रोमो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये