Bigg Boss 17: स्वॅग से करेंगे सबका स्वागत! बिग बॉसच्या घराचा भव्य सेट अन् सलमानची ग्रँड एन्ट्री
Bigg Boss 17 | सध्या सर्वांना उत्सुकता लागली आहे ती ‘बिग बॉस 17’च्या (Bigg Boss 17) नवीन पर्वाची. लवकर बिग बॉसचं हे नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तर बॉलिवूडचा भाईजान अर्थातच सलमान खान (Salman Khan) बिग बॉस 17चं सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. तर आता बिग बॉसच्या या नवीन पर्वाचा भव्यदिव्य सेट पाहायला मिळत आहे. तसंच सलमानची देखील या नवीन सेटवर ग्रँड एन्ट्री पाहायला मिळत आहे. सध्या सलमानचे काही खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
नुकताच सलमान खानचा बिग बॉस 17 मधील पहिला लूक समोर आला आहे. या नवीन पर्वात सलमान एकदम डॅशिंग अंदाजात दिसत आहे. तर आता सलमानचा हा पहिला लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये सलमान ब्लॅक टीशर्ट आणि लाल रंगाच्या जॅकेटमध्ये एकदम हटके अंदाजात दिसत आहे.
एकिकडे सलमानचा हा नवीन लूक व्हायरल होत असताना दुसरीकडे बिग बॉसचा भव्यदिव्य सेटही पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या या नवीन सेटवरती एक भव्यदिव्य रेल्वे इंजिन पाहायला मिळत आहे. सोबत सेंटर स्टेजला एक ड्रॅगन सेट देखील केला आहे. हा भव्य सेट ओमंग कुमार यांनी डिझाईन केला आहे. दरम्यान, 5 ऑक्टोबरपासून बिग बॉस 17 हे पर्व सुरू होणार आहे. तर हे नवीन पर्व कलर्स टीव्हीवर आणि जिओ सिनेमावर पाहता येणार आहे.