बिग बॉसच्या एक्स कंटेस्टेंटने उर्फीला घातली लग्नाची मागणी; अभिनेत्रीची प्रतिक्रिया समोर
मुंबई | बिग बॉस फेम उर्फी जावेद (Uorfi Javed) नेहमीच तिच्या वादग्रस्त लूकमुळे चर्चेत असते. उतिच्या ग्लॅमरस हॉट फोटोमुळे आणि व्हिडीओमुळे ती अनेकवेळा वादात सुद्धा अडकली आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक चाहते आहेत. त्यापैकीच एका बिग बॉस फेम चाहत्याने तिला थेट लग्नाची मागणी घातली आहे. तो हात जोडून उर्फीला आपल्याशी लग्न करण्याची विनंती करत आहे. विशेष म्हणजे उर्फी जावेदची प्रतिक्रियाही समोर आली आहे.
बिग बॉस फेम पुनीत सुपरस्टारने (Punit Superstar) सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो उर्फी जावेदला म्हणतो, ‘उर्फी जावेद, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. खूप दिवसांपासून मला एक गोष्ट सांगायची होती पण सांगता येत नव्हते. उर्फी मी तुझ्यासारखी मुलगी शोधत होतो. मी हात जोडून तुला माझ्याशी लग्न करण्याची विनंती करतो.
उर्फी जावेदची प्रतिक्रिया
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उर्फी जावेदची प्रतिक्रियाही समोर आली आहे. पापाराझीशी बोलत असताना तिने सांगितले की, मी लग्न तर करणार नाही पण ती त्याला आय लव्ह यू टू म्हणीन. आता दोघांच्या या संवादावर चाहतेही हसत आहेत. हे सर्व व्हिडिओसाठी केलेला स्टंट वाटत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
https://www.instagram.com/reel/C0yemJTSERP/?utm_source=ig_web_copy_link