ताज्या बातम्यापिंपरी चिंचवडपुणे

टेम्‍पोच्‍या धडकेत दुचाकीस्‍वाराचा मृत्‍यू

भरधाव वेगातील टेम्‍पोने धडक दिल्‍यामुळे दुचाकीस्‍वाराचा मृत्‍यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. २०) सकाळी सात वाजताच्‍या सुमारास पिंपरीतील मोरवाडी ते केएसबी चौकाकडे जाणा-या रस्‍त्‍यावर घडली.

सुनील महादेव यादव (वय ४१, रा. पवनानगर, काळेवाडी) असे अपघातात मृत्‍यू झालेल्या दुचाकीस्‍वाराचे नाव आहे. मिंटू कुमार सिंग (वय २२, रा. तापकीर मळा, काळेवाडी) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव आहे. पोलीस अंमलदार रमेश भागुजी दोरताले यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, मयत सुनील यादव हे शुक्रवारी सकाळी सात वाजताच्‍या सुमारास आपल्‍या दुचाकीवरून चालले होते. ते मोरवाडी ते केएसबी चौक या दरम्‍यानच्‍या रस्‍त्‍यावर आले असता आरोपी मिंटू सिंग हा चालवत असलेल्‍या टेम्‍पोने यादव यांच्‍या दुचाकीस पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या यादव यांचा मृत्‍यू झाला. अपघातानंतर जखमीला कोणतेही प्रथमोपचार न देता अपघात वाहन स्‍थळी सोडून पळून गेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये