अर्थइतरटेक गॅझेटमुंबईसिटी अपडेट्स

अब्जाधीशांची पसंती मुंबईला!

शहरामध्ये किती अब्जाधीश राहतात, यासंदर्भात हा अहवाल आहे. या रिपोर्टनुसार देशाची आर्थिक राजधानी मुंबईला अब्जाधीशांची सर्वाधिक पसंती आहे. एकट्या मुंबईत ३१ बिलेनियर आणि २४९ सेंटिमिलेनियर राहतात. २०३१ पर्यंत मुंबईतील हाय नेटवर्थ इंडिविज्युअल्सची संख्या ८० टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. यासंदर्भात ‘आज तक’ने वृत्त दिलंय. १ बिलियन डॉलर्स म्हणजेच १००० मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या श्रीमंतांना बिलेनियर म्हणजेच अब्जाधीश म्हणतात, तर ज्यांच्याकडे १०० मिलियन डॉलर ते १००० मिलियन डॉलर इतकी संपत्ती आहे, त्यांना सेंटिमिलेनियर म्हणतात. मुंबईला श्रीमंत लोकांची सर्वाधिक पसंती आहे, तर नवी दिल्ली दुसर्‍या
क्रमांकावर आहे.

दिल्लीत १५ बिलेनियर, १२२ सेंटिमिलेनियर, २००० हून अधिक मल्टिमिलेनियर आणि ३०,५०० हाय नेटवर्थ इंडिविज्युअल्स राहतात. आता आपण भारतातली अशी शहरं पाहणार आहोत, ज्या शहरांना श्रीमंत लोक सर्वात जास्त पसंती देतात. दिल्लीपूर्वी पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता ही भारताची राजधानी होती. या शहराला काही लोक भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणतात. या शहरात सध्या ६ बिलेनियर आणि ५० सेंटिमिलेनियर राहतात, तर ८०० हून अधिक हाय नेटवर्थ इंडिविज्युअल्स राहतात. कोलकात्यानंतर नंबर लागतो तो बंगळुरूचा. बंगळुरूमध्ये सध्या ६ बिलेनियर आणि ४६ सेंटिमिलेनियर तसेच ११,७०० हाय नेटवर्थ इंडिविज्युअल्स राहतात. पुढच्या १० वर्षांत त्यांची संख्या ९० टक्क्यांनी वाढू शकते, असा अंदाज आहे. बंगळुरूनंतर अजून एका दक्षिण भारतातील शहराला श्रीमंतांची पसंती आहे. ते शहर म्हणजे तेलंगणाची राजधानी हैदराबाद.या शहरात ५ बिलेनियर, ४६ सेंटिमिलेनियर आणि ७४० मल्टिमिलेनियर राहतात. त्यापाठोपाठ पुण्याचा नंबर लागतो. पुण्यात ३ मिलेनियर आणि २८ सेंटिमिलेनियर राहतात. पुण्यानंतर चेन्नईला श्रीमंतांची पसंती आहे. चेन्नईमध्ये ४ बिलेनियर आणि ३० सेंटिमिलेनियर आहेत. यानंतर गुरुग्राममध्ये २ बिलेनियर आणि १८ सेंटिमिलेनियर्स आहेत.

श्रीमंतांची सर्वाधिक पसंती असलेल्या शहरांमध्ये मुंबई, पुणे, दिल्ली आणि दक्षिणेतील काही शहरांचा समावेश आहे. परंतु सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या राज्याने देशाला मोठे उद्योगपती दिले त्या गुजरातमधील एकही शहर या यादीत नाही. गुजरातमधील सर्वात मोठे शहर असलेल्या अहमदाबादमध्ये एकही अब्जाधीश म्हणजेच बिलेनियर राहत नाही. त्याचप्रमाणे उत्तर भारतातील दिल्ली-एनसीआर वगळता इतर कोणतेही शहर या यादीत नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये