क्राईमताज्या बातम्यापुणे

बिश्नोई गँगचं पितळ उघड?; पुण्यातील आरोपींनी दिली खळबळजनक माहिती!

पुणे | Sidhu Moose Wala Case- प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे. तसंच आता संतोष जाधव आणि सौरभ महाकाल कांबळे यांनी लॅारेन्स बिश्नोई गँगशी संबंध असल्याची कबुली दिली आहे. तर नवनाथ सुर्यवंशीची संतोष जाधवला आसरा दिल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे, अशी माहिती अप्पर पोलीस महासंचालक कुलवंत सारंगल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

अप्पर पोलीस महासंचालक कुलवंत सारंगल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची २९ मे रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी पंजाब पोलिसांच्या तपासामध्ये पुण्यातील सौरभ महाकाळ आणि संतोष जाधव या दोघांची नावं समोर आली आहेत. त्या प्रकरणी मंचर येथून सौरभ महाकाळ याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, सौरभ महाकाळची चौकशी सुरू असताना नवनाथ सुर्यवंशी याने संतोष जाधवला गुजरात येथील भूज येथे आसरा दिल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून गुजरात येथून संतोष जाधव याला रविवारी (१२ जून) ताब्यात घेण्यात आले. यावेळी संतोष जाधवने टक्कल केल्याचं आढळून आलं. ओळख लपवून ठेवण्यासाठी त्याने टक्कल केल्याचे आरोपी संतोष याने सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये