ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“भाजप आणि नथुराम गोडसेंचा DNA एकच”, यशोमती ठाकूर यांचं टीकास्त्र

अमरावती | Yashomati Thakur – काही दिवसांपूर्वी भाजपनं (BJP) काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या फोटोमध्ये राहुल गांधींना रावणाच्या रूपात दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे आता भाजप आणि काँग्रेसमध्ये (Congress) आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे. तर आता यावरून काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

यावेळी यशोमती ठाकूर म्हणाल्या की, भाजप आणि नथुराम गोडसे यांचा DNA एकच आहे. कारण नथुराम गोडसेंनी पण महात्मा गांधींना रावणाचं रूप दिलं होतं. तसंच गोडसेंनी स्वत: महात्मा गांधींना मारायचा प्रयत्न केला. तर आता संघ आणि भाजप देखील तेच करत असतात.

महात्मा गांधी हे त्या युगातले असो किंवा या युगातले असो गांधी गांधी आहेत. गांधी हे देशाचा मूळ डीएनए आहेत. त्यामुळे कितीही मारण्याचा प्रयत्न केला तरी गांधी मरत नसतात. सत्ताधाऱ्यांच्या डोक्यामध्ये विकृती आहे, ती विकृती नष्ट झाली पाहिजे. येत्या दसऱ्याला त्यांचं दहन झालं पाहिजे, असंही यशोमती ठाकूर म्हणाल्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये