एकनाथ शिंदेच्या ‘त्या’ वक्तव्याने भाजप तोंडघशी!

मुंबई : बुधवार दि. २३ रोजी एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांना संबोधित कारतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात ते म्हणाले, आपल्याला एका राष्ट्रीय पक्षाचा पाठींबा आहे. बंडखोरी करणाऱ्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांची एकमताने गटनेतेपदी निवड केली आहे. त्यानंतर आमदरांशी बोलताना त्यांनी एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असल्याचं सांगितले. कुठेही कमी पडणार नाही असे शिंदे यानी बंडखोर आमदारांना सांगितले आहे.
शिंदे पुढे बोलताना ते म्हणाले, कुठेही काही लागलं तरी कमी पडणार नाही, असा शब्द राष्ट्रीय पक्षाने दिला आहे. आता फक्त एकजुटीने राहयचं आहे. आपलं सुख, दु:ख सारखंच आहे. विजय आपलाच आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपला या प्रकरणात क्लीन चिट दिली असतानाच दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी मात्र, राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असल्याची कबुली दिली.
राज्यातील राजकीय घडामोडीला सध्या वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत राजकीय भूकंप आला आहे. शिंदे यांच्यासोबत जवळपास ४० पेक्षा जास्त आमदार आहेत. आता एकनाथ शिंदे यांनी या बंडामागे भाजपचा सपोर्ट असल्याचं मान्य केले आहे. त्यामुळे आमचा शिंदे यांच्या बंडखोरीशी काही संबंध नाही म्हणणारे राज्यातील भाजप नेते आता तोंडावर पडले आहेत.